नवी दिल्ली – आयपीएल सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. अशात सर्व संघ आपली रणनीती ठरवत आहेत. या सगळ्यात दिल्ली कॅपिटल्सने मोठा निर्णय घेतला आहे. दिल्लीने ऋषभ पंतच्या जागी डेव्हिड वॉर्नरला कर्णधारपद दिले आले. यासोबतच दिल्लीच्या टीमने एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. ज्यामुळे भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचे चाहते चांगलेच खुश झाले आहेत.
दिल्ली कॅपिटल्सने त्यांच्या टीम संचालकपदी सौरव गांगुलीची नियुक्ती निश्चित केली आहे. दादाच्या या ग्रँड एंट्रीमुळे आता दिल्ली कॅपिटल्सला मोठे बूस्टर मिळणार आहे. दादाच्या संपूर्ण अनुभवाचा उपयोग दिल्ली कॅपिटल्स आता यंदाच्या हंगामात करून घेणार आहे.
गांगुलीने आयपीएल 2019 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा मार्गदर्शक म्हणून काम केले होते. यादरम्यान त्याने मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंगसोबत काम केले. नियुक्तीबद्दल बोलताना, सौरव गांगुली म्हणाला माझ्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने संघ म्हणून चांगली कामगिरी केली होती. पुढील काही महिन्यांत आपल्या सर्वांचा वेळ आणखी चांगला जाईल” अशी आशा देखील यावेळी त्याने व्यक्त केली.
डेव्हिड वॉर्नर (कॅप्टन), अक्षर पटेल (व्हीसी), पृथ्वी शॉ, मनीष पांडे, फिलिप सॉल्ट, रायली रुसो, रिपल पटेल, रोवमन पॉवेल, सरफराज खान, यश धुल, मिचेल मार्श, ललित यादव, एनरिच नॉर्टजे, चेतन साकारिया, कमलेश नागरकोटी , खलील अहमद, लुंगी एन्गिडी, मुस्तफिजुर रहमान, अमन खान, कुलदीप यादव, प्रवीण दुबे, विकी ओस्तवाल, इशांत शर्मा, मुकेश कुमार.