मुंबई – अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री काजोलची लेक ‘न्यासा देवगण’ कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असते. न्यासा सध्या आपले शिक्षण पूर्ण करत असल्यामुळे सिनेमांपासून लांब आहे. असं असल तरी न्यासा नेहमीच बॉलिवूड पार्ट्यांमध्ये दिसून येते. स्टार किड्सच्या यादीत आर्यन खान नंतर सर्वात चर्चेत देखील न्यासाचं नाव असत. बोल्ड अंदाज असो वा डिनरडेट आजकाल न्यास सगळीकडेच पाहायला मिळते.
मात्र अनेकदा ती ट्रोलिंगची शिकार देखील होते. सोशल मीडियावर न्यासा देवगणला खूप ट्रोल केलं जातं. त्यावर आता तिचे वडील अभिनेता अजय देवगणने प्रतिक्रिया दिली आहे. सध्या अजय त्याच्या आगामी ‘भोला’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या प्रमोशनिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत अजयला न्यासाच्या ट्रोलिंगविषयी प्रश्न विचारण्यात आला.
त्यावर तो म्हणाला, “मी माझ्या दोन्ही मुलांना हेच समजावते की ऑनलाइन लिहिलेल्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका. त्यामुळे त्यांना कोणता त्रास झाला नाही पाहिजे. मला माहीत नाही की लोकांच्या मनात इतकी नकारात्मकता कुठून येते? आता मी सुद्धा त्याकडे दुर्लक्ष करण्यास शिकलोय आणि मी माझ्या मुलांनाही त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला देतो”. असं विधान अजय देवगणने केलं आहे.
दरम्यान, न्यासा देवगण लवकरच आपला बॉलिवूड डेब्यू करेल अशा चर्चा काही दिवसांपूर्वी सुरु होत्या. परंतु अभिनेत्री काजोलने ती अद्याप आपले शिक्षण पूर्ण करणार असलयाचे सांगत बॉलिवूड डेब्यूच्या बातम्यांना पूर्ण विराम दिला. त्यामुळे आता न्यासा आपल्या आई-वडिलांच्या पाऊलावर पाऊल केव्हा टाकणार हे अद्यापतरी सांगता येणार नाही.