मुंबई – मुंबई – लॉकडाऊनच्या काळात प्रवासी कामगारांना सोनू सूदने आपापल्या प्रांतात परतण्यासाठी वाहनांची सोय करून दिली होती. त्याने विदेशात शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी पुढाकार घेऊन त्यांना मदतही केली होती. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क भरण्यापासून ते ऑपरेशनसाठी लागणारा वैद्यकीय खर्च करेपर्यंत सर्व गरजवंतांची गरज सोनू सूदने या काळात पूर्ण केली होती.
Sonu Sood tailor shop.
यहां मुफ्त में सिलाई की जाती है।
पैंट की जगह निकर बन जाए, इसकी हमारी गारंटी नहीं 😂 pic.twitter.com/VCBocpUSum— sonu sood (@SonuSood) January 16, 2021
यातच त्यांच्या या मदतीमुळे त्याने अनेकांची मने जिंकली आहे. त्याने केलेल्या प्रत्येक कामाकडे त्याचे चाहते लक्ष ठेवून असतात. त्याने केलेल्या ट्विटला नेहमीच लाखोंच्या घरात लाईक मिळत असते अशातच पुन्हा एकदा त्यांचा एक व्हिडियो शेअर केला आहे.
या व्हिडियोमध्ये सोनू सूद एखाद्या शिंप्याप्रमाणे मशिनवर खट-खट असा आवाज करत कपड्यांवर शिलाई मारत आहे. सुरूवातीला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोनू सूद इतक्या सहजतेने शिलाई करत आहे. या पोस्टला त्याने ‘यहां मुफ्त में सिलाई की जाती है। पैंट की जगह निकर बन जाए, इसकी हमारी गारंटी नहीं’ दिले आहे.
दरम्यान, अभिनेता सोनू सूद यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याचं समोर होती. सोनू सूद अचानक पवारांना भेटल्यामुळे राजकीय वर्तुळात शरद पवारांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले होते.मात्र ही एक सदिच्छा भेट असल्याचं म्हटलं जात आहे. सोनू सूदचं निवासस्थान बेकायदा असल्याचं सांगत मुंबई महानगरपालिकेने त्याला नोटीस बजावली आहे.