ट्रॉलर्सना सोनाक्षीचा पंच

“केबीसी’मध्ये सेलिब्रिटी गेस्ट म्हणून आलेल्या सोनाक्षी सिन्हाला रामायणाशी संबंधित प्रश्‍नाचे उत्तर देता आले नाही. त्यामुळे सोशल मिडीयावर तिला ट्रोल केले जायला लागणार आहे. शेकडो जणांनी तिला “हिंदू पुराणकथा माहीती नाही का?’ असा प्रश्‍न विचारला. अशाच प्रकारच्या अनेक मीम द्वारे ट्रोल करून छळल्यावर सोनाक्षीने कोठूनतरी धीर एकवटला आणि या ट्रोलिंगला अगदी अनोख्या पद्धतीने उत्तर दिले.

“मला तर पायथागोरसचा सिद्धांत, मर्चंट ऑफ व्हेनिस, पाढे, मुगल साम्राज्याची घराण्यातील क्रमवारी एवढेच नाही, तर काय काय आठवत नाही आहे, हे देखील आपल्याला आठवत नाही. ट्रोल करणाऱ्यांनो जर तुमच्या जवळ काही काम नसेल, आणि जर खूप वेळ रिकामा असेल, तर कृपया या सगळ्या बाबतही मीम्स बनवा ना. मला मीम्स खूपच आवडतात.’ असे सोनाक्षीने म्हटले आहे.

तिच्या या उपहासात्मक टीका आणि आवाहनामुळे ट्रोलर्सची तोंडे बंद झाली आहे. “केबीसी’मध्ये रामायणात संजीवनी वटीच्या वापराबाबतच्या प्रश्‍नाला तिला लाईफलाईन वापरावी लागली होती. यामुळे ट्रोलर्सनी तिची तुलना आलिया भट आणि अनन्या पांडेशीही केली होती.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×