बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला काही जुन्या गोष्टींची आठवण येत आहे. त्यामुळे सोनाक्षीने आपला एक फोटो शेअर केला आहे. या सेल्फी फोटोत सोनाक्षी खुपच स्टायलिश ब्ल्यू जंपसूट आणि चष्मामध्ये दिसत आहे. हा फोटो शेअर करत तिने लिहिले की, गेल्या वर्षी याच दिवशी ग्रूमिंग आणि सेल्फीसह अन्य गोष्टी होत होत्या.
दरम्यान, अभिनेत्रीने अलीकडेच ट्विटरवर चाहत्यांशी संवाद साधताना सांगितले होते की, तिला टोल्सचा सामना कसा करावा लागतो. सोनासेज सेशनमध्ये जेव्हा एक यूजरने ट्विटरवर सोनाक्षीला तिच्या बॅकग्राउंड पिक्चरबद्दल विचारले होते, तेव्हा या विषयाचा उल्लेख आला.
या फोटोत अभिनेत्री आपले डोळे बंद करत कानात बोट घालत उभी असलेली दिसत आहे आणि तिच्या टी-शर्टवर लिहिले आहे, “मी ऐकत आहे.’ या फोटोविषयी सोनाक्षी म्हणाली, याचा अर्थ असा होतो की मी ट्रोलवर अशीच प्रतिक्रिया देते. वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास सोनाक्षी लवकरच अजय देवगणसोबत “भुज द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. परंतु लॉकडाउन सुरू असल्याने तो कधी प्रदर्शित होईल हे अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही.