बॉलीवुड पार्श्वगायिका सोना महापात्राने नुकतेच स्विमूटमधील काही फोटो शेअर केली. त्यानंतर सोशल मीडियावर एक संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. काही नेटकऱ्यांनी तिच्या लूकचे कौतुक केले, तर इतरही काही होते ज्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. ट्रोलर्सनी रिट्वीटद्वारे ही छायाचित्रे नकळत व्हायरल देखील केली.
काहींना कमेंट बॉक्समध्ये दिल व आगीच्या इमोजी पोस्ट केल्या. तर काहींनी तिच्यासारख्या गंभीर व्यक्तीने या अवतारात सोशल मीडियावर येणे योग्य नसल्याचे सांगितले. कैलाश खेर, अनु मलिक आणि मीटूशी जोडून नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या. अनु मलिकवर “मीटू’बाबतचे आरोप केल्यामुळे सोना चर्चेत आली होती. तिच्या या फोटोमुळे तिची इमेज विशेष खालावली आहे. तिच्या वर्तनामध्ये विसंगती असल्याची टीका तिच्यावर केली गेली आहे.
ट्रोल झाल्यावर सोनाने त्यांना जोरदार उत्तर दिले. ती म्हणाली, जसे मी पोस्टात काम करण्यास नकार दिला त्याचप्रमाणे मी कोणत्याही एका स्लॉटमध्ये बसण्यास नकार देते. सोनाने सेलिब्रिटी हेअरस्टायलिस्ट आणि बिग बॉस स्पर्धक सपना भवानी यांनाही चोख प्रत्युत्तर दिले.