Amruta Khanvilkar Social Media Post| अभिनेत्री अमृता खानविलकर तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने सर्वांची मनं जिंकते. मराठी सिनेमासह हिंदी चित्रपटात देखील तिने आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. मात्र अनेकदा कौतुकासह तिला ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो. अशातच आता अमृतानं फेसबुकवर एक पोस्ट शेअर करुन ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.
अमृताची पोस्ट Amruta Khanvilkar Social Media Post|
अमृतानं फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं लिहिलं, “आशा करते तुमचा गुढी पाडवा छान साजरा झाला असेल. नव्या वर्षाची सुरुवात तुम्ही मागच्या गोष्टी विसरून केलीच असणार. नवीन मनोकामना, नवी स्वप्ने, देवा चरणी ठेऊन ती पूर्ण व्हावीत अशी प्रार्थना केली असणार. जर तुम्ही हे सगळं केलय तर तुमच्या सारखीच मी सुद्धा आहे मी ही हेच केलं. कारण मी देखील फक्त नावाने नाही तर धर्माने मराठी आहे. संस्काराने मराठी आहे.”
“मुळची कोकणातील, पण जन्म मुंबईचा आहे, मी हि कोणाची तरी मुलगी आहे, बहीण आहे, मावशी आहे, ताई आहे, मैत्रीण आहे, बायको आहे आणि मग मी ज्या क्षेत्रात काम करते त्यामुळे मी एक अभिनेत्री आहे. तुम्हाला हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे गेले काही दिवस नवीन कामाच्या निमित्ताने मी वेग वेगळे मुलाखत देत आहे. वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर, आता ह्या क्षेत्रात असल्यामुळे कधीतरी चांगलं कधीतरी वाईट हे ऐकण्याची सवय झालीच आहे. पण ट्रोलिंगच्या नावाखाली इतक्या घाणेरड्या आणि लाजिरवाण्या गोष्टी प्रेक्षक बोलतात की लाज वाटते.”
“वेशभूषा असो, हसणं असो, बोलणं असो, एका स्त्रीच्या प्रतेय्क गोष्टी वर किती, किती बोलायचं ? आणि त्याला काही सीमा का नाहीये ? जे लोक स्वतःचं खरं नाव किंव्हा साधा DP सुद्धा लावत नाहीत अशी लोक बोलतात ? मज्जा वाटते तुम्हाला ? मला असं वाटतं तुम्हाला फक्त स्वतःची लाज वाटायला पाहिजे. सोशल मीडियाचा चांगला वापर सगळ्यांनाच करता येतो असं नाहीये …. पण ह्या वर जे तुम्ही लिहिता … बोलता …. ह्यात फक्त आणि फक्त तुमचे संस्कार दिसतात. असो, मी normally ह्या गोष्टीं कडे दुर्लक्ष करतेच. पण कधी कधी समोरच्याला हे सांगणं गरजेचं असतं कि गप्प राहणं हे दुबळेपण नाही तर ताकद आहे.” Amruta Khanvilkar Social Media Post|
अमृताच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, मागील वर्षी प्रदर्शित झालेला अमृताचा ‘चंद्रमुखी’ चित्रपट चांगलाच गाजला होता. यातील चंद्रा या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकुळ घातला होता. त्यानंतर आता तिची ‘लुटेरे’ या नव्या हिंदी वेबसीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. यात अमृता खानविलकर महत्वाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. अमृतासोबत रजत कपूर, विवेक गोंबर आणि आमिर अली हे देखील महत्वाच्या भूमिकेत आहेत.
हेही वाचा: