Karmaveer Bhaurao Patil Biopic| कर्मवारी भाऊराव पाटील यांचा जीवनपट आता मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून कर्मवीर अण्णांनी राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना शिक्षण दिले. भाऊराव पाटील हे महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाचे महत्त्वाचे सदस्य होते.
भाऊराव पाटील यांनी शिक्षणाचं महत्त्व ओळखून ग्रामीण भागात शिक्षण संस्था सुरू करण्याचा निर्णय घेतला. गरीब आणि बहुजनांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी देखील खूप प्रयत्न केले. अनेकदा त्यांना विरोध करण्यात आला. मात्र विरोधाला न जुमानता शिक्षणाच्या प्रसाराचं कार्य त्यांनी सुरू ठेवले.
शिक्षण क्षेत्रासाठी मोलाची कामगिरी करणाऱ्या महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांचं जीवनचरित्र आता मोठ्या पडद्यावर येत आहे. अभिनेते किशोर कदम यांनी कर्मवीरांची भूमिका साकारली आहे. कर्मवीर अण्णांच्या जीवनातील काही निवडक प्रसंग आणि घटना यांचा समावेश या चित्रपटात करण्यात आला आहे. “कर्मवीरायण”असे या चित्रपटाचे नाव आहे.
धनंजय भावलेकर यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तर अनिल सपकाळ आणि धनंजय भावलेकर यांनी चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. किशोर कदम, सुहास शिरसाट, उपेंद्र लिमये, देविका दफ्तरदार, उषा नाईक अशा दिग्गज कलाकारांचा समावेश या चित्रपटात असणार आहे. हा चित्रपट आता 17 मे पासून महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा:
शेअर बाजारात मजबूती ! बँक निफ्टी नवीन विक्रमी उच्चांकावर, सेन्सेक्स 74,800 वर उघडला