देहूगाव, (वार्ताहर) – देहू नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक एकमध्ये मूलभूत नागरी सुविधांसह विविध विकास कामे करण्याच्या मागणीसाठी प्रभागातील नागरिकांच्या वतीने नगरसेविका मीना कुऱ्हाडे यांनी मुख्याधिकारी यांच्या नावाचे निवेदन कार्यालयीन अधीक्षक रामराव खरात यांना दिले आहे.
देहू नगरपंचायतीचे निवडणूक होऊन दोन वर्षे होऊन गेले असतानाही अद्याप पर्यंत प्रभाग क्र.१ मध्ये विविध विकासकामे झाली नाहीत त्यामुळे नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. प्रभागातील नागरिक वारंवार माझ्याकडे तक्रार करीत आहेत. नगरपंचायतीने लेखी स्वरूपात नागरिकांना उत्तर द्यावे, अशी मागणी नगरसेविका मीना कुऱ्हाडे यांनी केली आहे.
काही दिवसांत लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्याची आचार संहिता लागू होईल. बांधकाम सभापती पुनम काळोखे यांनी आणि मी स्वतः आपल्याकडे वारंवार पाठपुरा केला असल्याने प्रशासनाने दुर्लक्ष केले. नागरिक आंदोलनाच्या पवित्रात असल्याचे नगरसेविका मीना कुऱ्हाडे यांनी निवेदनात म्हटले आहे.