सोलापूर – येथिल सिद्धेश्वर देवस्थानकडून कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनात विविध वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. तर कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील मंगसुळीचे शेतककरी विलास गणपती नाईक यांनी त्यांचा रेडाही प्रदर्शनासाठी ठेवला आहे. हा रेडा पाच वर्ष वयाचा असून तो जन्मापासून नाईक यांच्याकडे आहे. पाच वर्षांपूर्वी नाईक यांनी हरियाणातून मुऱ्हा जातीची म्हैस दीड लाख रुपयांना आणली होती. त्या म्हशीपासून हा रेडा झाला आहे.
या रेड्याचा दररोरचा देखभाल, खानपान खर्च 2 हजार रुपये आहे. तर तो नाईक यांना दिवसाला 10 हजार रुपये कमवून देतो असा दावा नाईक यांनी केला आहे. दरम्यान, या प्रदर्शनात हा रेडा आकर्षण ठरत असून विविध भागातून लोक त्याला पाहण्यासाठी येत आहेत. हरियाणातील काही मंडळींनी नाईक यांच्याकडे रेडा विकत घेण्याची इच्छा दर्शवली असून दीड कोटी रुपये देण्यासाठी ही मंडळी तयार असल्याचे सांगण्यात येत आहे. नाईक यांनी या रेड्याचे नाव गजेंद्र ठेवले आहे.