सामुदायिक विवाह सोहळ्यात सामाजिक झालर

ओझरमध्ये 16 जोडपी विवाहबद्ध : स्त्रीभ्रूण हत्येविरोधात घेतली शपथ

ओझर – श्री क्षेत्र ओझर (ता. जुन्नर) येथे रविवार (दि. 16) रोजी शाही सामुहिक विवाह सोहळ्याचा दुसरा ग्रुप थाटामाटात पार पडला. यादिवशी 16 जोडपी विवाहबद्ध झाल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बी. व्ही. मांडे यांनी दिली.

सकाळी साडेदहा वाजता देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बी. व्ही. मांडे, उपाध्यक्ष रंगनाथ रवळे, सचिव आनंदराव मांडे, विश्‍वस्त विजय घेगडे, श्रीराम पंडित, माजी विश्‍वस्त देवराम कवडे, संभाजी जाधव, आत्माराम गाढवे, विलास बेनके, रघुनाथ कवडे यांच्या हस्ते गणेश पूजन झाले. सुपारी फोडणे, साखरपुडा व टिळ्याचा मॉडेल असा संगीतमय कार्यक्रम झाला.

यामध्ये साखरपुड्याच्या व टिळ्याच्या कार्यक्रमाच्याशेवटी वधू- वरांना स्त्रीभ्रूणहत्या करणार नाही व करून देणार नाही, अशी शपथ देण्यात आली. सोहळ्यासाठी देवस्थानतर्फे विविध सुविधा पुरवण्यात आल्या. दुपारी साडेतीन वाजता नवर देवांची मिरवणूक श्रींच्या मंदिराकडे दर्शनासाठी नेऊन चार वाजता सनईच्या मंगलस्वरात व्यासपीठाकडे आगमन झाली.

याप्रसंगी वधू- वरांना आशीर्वाद ट्रस्टचे माजी अध्यक्ष शाकुजी कवडे, विश्‍वस्त गणपतराव कवडे, कैलास मांडे, गणेश कवडे, संजय उकिर्डे व बबनराव थोरात यांनी दिले.

ट्रस्टचे खजिनदार किशोर कवडे, राजश्री कवडे, कैलास घेगडे, मंगेश मांडे, मिलिंद कवडे, दशरथ मांडे, अजित कवडे यांची उपस्थिती होती. सव्वाचारच्या मुहूर्तावर जोडपी विवाहबद्ध झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ट्रस्टचे व्यवस्थापक जगन्नाथ कवडे यांनी केले.

 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.