बारामती, {प्रमोद ठोंबरे} – संपूर्ण देशात लक्षवेधी ठरलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात बसपाच्या प्रमुख मायावती यांनी सोशल इंजिनीअरिंगचा प्रयोग करण्यासाठी तयारी केली आहे. बसपाकडून धनगर समाजाला उमेदवारी देणार असल्याने ही उमेदवारी कोणाच्या पथ्यावर पडणार, याची चर्चा सुरू झाली आहे. बसपाचा हत्ती आता बारामतीच्या मैदानात कोणती चाल खेळणार, याकडे लक्ष लागले आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात यावेळी शरद पवार यांच्या कुटुंबीयात दुफळी निर्माण झाली आहे, त्यामुळे काका, पुतण्याचा संघर्ष महाराष्ट्रात चर्चेचा विषय झाला आहे, अगदी खालच्या पातळीवर दोन्ही गटांकडून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते, नेते टीका एकमेकांवर करीत आहेत, हा संघर्ष पहिल्यांदाच पवार घराण्यात पाहायला मिळत आहे. दुसरीकडे संपूर्ण देशात भाजपची सत्ता असताना बारामतीत मात्र भाजप शांत आहे,
भाजप लांबून या सर्व परिस्थितीकडे बघत आहे, त्यामुळे बारामतीत पहिल्यांदाच पवारांच्या होम पिचवर चुरस निर्माण झाली आहे, दुसरीकडे ओबीसी समाज देखील आपली ताकद दाखवण्याच्या तयारीत आहे, ओबीसी, बहुजन समाजाचा मतदार बारामती लोकसभेत मोठ्या प्रमाणावर आहे,
त्यामध्ये धनगर समाजाचे मोठे निर्णायक मतदान या मतदारसंघात आहे, धनगर समाजाचे महादेव जानकर यांनी सुप्रिया सुळे यांना टफ फाईट दिली होती. तब्बल चार लाख 51 हजार मते त्यावेळी त्यांना मिळाली होती, हे देखील महत्वाचे आहे,
बसपा गेम चेंजर ठरणार काय?
२००४ मध्ये मायावती यांनी उत्तर प्रदेशात सोशल इंजिनीअरिंगचा प्रयोग राबवून एकहाती सत्ता काबीज केली होती. त्यावेळी त्यांची चर्चा देशभर झाली होती. आता देशात सोशल इंजिनीअरिंग करण्यात माहीर असलेल्या” मायावतीं”यांनी देखील बारामती लोकसभा मतदारसंघात लक्ष घातले आहे
“बसपा”ने धनगर समाजाचा उमेदवार निश्चित केला असल्याचे बोलले जात आहे, त्यामुळे धनगर, ओबीसी समाजाचा देखील खासदार होऊ शकतो, धनगर समाजाचा उमेदवार दिला तर” बहुजन समाज पार्टी” गेम चेंजर ठरू शकते, अशी शक्यता निर्माण झाली आहे,