मुंबई – बॉलीवूडचा दबंग सलमान खानचा शो ‘बिग बॉस 16’ सुरुवातीपासूनच चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. पण आता शोने प्रेक्षकांची मने मोडली आहेत. चाहत्यांच्या हृदयाचा प्राण असलेल्या अब्दू रोजिकला शोमधून बाहेर काढण्यात आले आहे. अब्दूला बिग बॉसच्या घराला निरोप देताना पाहून त्याच्या सर्व चाहत्यांच्या डोळ्यात ओलावा आला आहे.
अब्दू बेघर झाल्याच्या वृत्ताने चाहत्यांना धक्का बसला आहे. अब्दूचे सोशल मीडियावर खूप मोठे चाहते आहेत. अब्दू बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचा चाहता आहे, आणि अब्दूला भारतातही खूप प्रेम मिळाले आहे.
मात्र, आता काही दिवस अब्दू बिग बॉसच्या घरात दिसणार नाही. एका व्हिडिओ कंपनीच्या शूटिंग करता अब्दू काही दिवस या शो मधून बाहेर गेल्याचे बिग बॉसने सांगितलं आहे. सोशल मीडियावर या बातमीने अब्दूचे चाहते संतापले आहेत.
Abduuuuuuu my boy 💔😭#AbduRozik #BiggBoss16 pic.twitter.com/DjB1Ug0c83
— 𝓨 ˢʰᵉʰ ✨#StopBullyingAbdu (@shehnazziana) December 16, 2022
अब्दू रॉजीक परदेशी असूनही त्याने आपल्या निरागसतेने भारतातील लोकांची मने जिंकली आहेत. आता तो शो मधून बाहेर गेला असून, ट्विटरवर चाहते अब्दुसाठी बिग बॉस शो न पाहण्याची धमकी देत असल्याचे दिसून येत आहे. या संदर्भातील अनेक व्हिडिओ ट्विटवर व्हायरल होत आहे.
एका चाहत्याने लिहिले की, ‘अब्दूचे बिग बॉसमधून जाणे निश्चित आहे, मग आम्ही शो का पाहावा? अब्दूला शोमधून काढून टाकल्याबद्दल ट्विटरवर यूजर्स दु:ख व्यक्त करत आहेत’, यूजर्सचे म्हणणे आहे की अब्दूला घरातून बाहेर पडताना पाहणे आमच्यासाठी खूप कठीण होते.