नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षावर मोठा आरोप केला आहे. राजकीय फायदा मिळवण्यासाठी हे कोणत्याही थराला जाऊ शकतात, असा दावा करत मलिक यांनी काही खळबळजनक वक्तव्य केली आहेत. मलिक यांच्या मुलाखतीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
सत्यपाल मलिक यांनी एका मीडिया हाऊसला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदींसह भाजपवर जोरदार टीका केली. ते म्हणाले,”मला भिती याची आहे की कोणी काही खोडसाळपणा करेल. जसं की राम मंदिरावर हल्ला करतील, भाजपाच्या मोठ्या नेत्याला मारतील. ते अशी कामं करू शकतात. जे पुलवामा घडवू शकतात ते काहीही करू शकतात” असा थेट इशारा मलिक यांनी दिला आहे.
मलिक पुढे म्हणाले,”त्यांना संसदेची अजिबात पर्वा नाही. ते चुकीच्या मार्गाने जात आहेत. मी खात्री देतो की, २०२४ मध्ये हे जिंकणार नाही” असं सत्यपाल मलिक व्हिडीओमध्ये म्हणाले आहेत. हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
कितनी भयंकर चीज कह दी कश्मीर के पूर्व राज्यपाल सत्यपाल मलिक ने!
“मुझे यह डर है, यह लोग कहीं राम मंदिर, या किसी बड़े भाजपा नेता के ऊपर हमला ना करवा दें! जो पुलवामा करवा सकता है वह कुछ भी करवा सकता है!”
आज तक पुलवामा की कोई जवाबदेही तय नहीं करी गई। हमला होने दिया गया या करवाया गया? pic.twitter.com/c3QSqkpXQ3— Prashant Bhushan (@pbhushan1) July 30, 2023
मलिक यांनी यापूर्वी देखील पंतप्रधान मोदींसह भाजपवर अनेकदा टीका केलेली आहे. यापूर्वी पुलवामा हल्ल्यावरून देखील मलिक यांनी भाजपवर ताशेरे ओढले होते. आता पुन्हा एकदा मलिक यांनी भाजपवर खळबळजनक टीका केली आहे.