किव्ह – युक्रेनवर आपले हल्ले रीशयाने सुरूच ठेवले आहेत. काळ्या समुद्रातील एका बेटावर रशीयन युध्दनौकांनी बॉम्बिंग करण्याची धमकी दिल्यानंतरही युक्रेनच्या वीर जवनांनी त्याला भीक घातली नसल्याचे समोर येत आहे.
स्नेक बेटांवर रशियनांनी संपर्क साधला. झिन्ही बेट म्हणूनही या बेटाची ओळख आहे. रशियन अधिकारी म्हणाले, “ही लष्करी युध्दनौका आहे. रशियन युध्दनौका. रक्तपात आणि अनावश्यक प्राणहानी टाळण्यासाठी शस्त्रे टाकून शरण या. नाहीतर तुमच्यावर बॉम्ब टाकावा लागेल. युक्रेनी सैनिक उत्तर देताना म्हणतो “रशियन युध्दनौका… जा तुझी तू … कर!’ या बेटावरून बाहेर आलेला हा अखेरचा संवाद आहे.
युक्रेनचे सर्व 13 जवान रशियाच्या तोफगोळ्यांच्या माऱ्यात मारले गेले. रशियाचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले, “त्यांनी मरण स्वीकारले पण पळ काढला नाही. देशाचे हिरो म्हणून त्यांचा सन्मान करण्यात येईल.’
हे स्नेक बेट युक्रेनच्या मुख्य भूमीपासून 48 किमी अंतरावर आहे. तर रशियापासून त्याचे अंतर 300 किमी आहे. अवघ्या 46 एकराचे हे बेट युक्रेनच्या सागरातील हक्कासाठी महत्वाचे असल्याचे नाटोच्या थिंक टॅंकने गेल्या वर्षी नमूद केले होते. क्रिमियावर हल्ला केल्यानंतर झेलेन्स्की यांनी याच बेटावर गेल्यावर्षी पत्रकार परिषद घेतली होती. क्रिमियाचा घास घेण्याची तयारी रशियाने सुरू केल्यानंतर ही पत्रकार परिषद घेण्यात आली होती. “हे बेट युक्रेनच्या मुख्य भू भागापासून दूर असले तरी आम्ही त्याचे प्राणपणाने रक्षण करू’, हे झेलेन्स्की यांचे वाक्य सत्यात उतरले आहे.