किव्ह, (युक्रेन) – रशियाने शनिवारी रात्री युक्रेनवर नव्याने ड्रोन हल्ला केला आहे. आदल्याच दिवशी युक्रेनने रशियाच्या बेलगोरोड शहरावर उखळी तोफांचा मारा केला होता. त्यामध्ये २४ जण जखमी झाले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून रशियाने हा हल्ला केला.
युक्रेनच्या पूर्वेकडील खारकिव शहरावर झालेल्या या हल्ल्यामध्ये एकूण २८ जण जखमी झाले. या हल्ल्यामध्ये मध्यवर्ती हॉटेल, अपार्टमेंट इमारती, बालवाडी, दुकाने आणि प्रशासकीय इमारतींचे नुकसान झाले, राजधानीच्या परिसरातीलकाही महत्वाच्या इमारतींना याड्रोनमुळे आग देखील लागली असल्याचे स्थानिक अधिकार् यांनी सांगितले.
याशिवाय एकूण १०८जण जखमी झाल्याचे प्रादेशिक गव्हर्नरांनी सांगितले. युक्रेन आणि रशियातील युद्ध गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये सुरू झाल्यापासूनचा रशियाचा हा आतापर्यंतचा सर्वात भीषण ड्रोन हल्ला होता.
हल्ल्यामध्ये रशियाने चेक प्रजासत्ताकच्या बनावटीच्या व्हॅम्पायर रॉकेट आणि ओल्खा क्षेपणास्त्रांचा वापर केला होता. मात्रया व्यतिरिक्त अन्य कोणतीही माहिती रशियाच्या संरक्षण मंत्रालयाकडून उपलब्ध करून देण्यात आली नाही.
कोणत्याही गुन्हेगाराला शिक्षा न करता सोडून दिले जाऊ सकत नाही, असे देखील रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची बैठक
युक्रेनने काल बेलगोरोड शहरावर केलेल्या मार् यानंतर रशियाने संयुक्त रा,ट्राच्या सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक बोलावली. युक्रेनने रशियावर दहशतवादी हल्ला केल्याचा आरोप रशियाचे राजदूत वासिली नेबान्झिया यांनी या बैठकीमध्ये केला. क्रेनने रशियाच्या नागरिकांना लक्ष्य करण्याच्या उद्देसानेच बेलगोरोड शहरावर हल्ला केला होता, असे ते या बैठकीमध्ये म्हणाले.