चिंबळी – श्रीक्षेत्र आळंदी येथील मंडल अधिकारी चेतन चासकर यांची नुकतीच बदली होऊन त्यांच्या जागेवर स्मिता जोशी यांची नियुक्ती झाली आहे.
कुरुळी ग्रामपंचायतीच्या वतीने माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम सोनवणे, उपसरपंच विशाल सोनवणे, सदस्या अनिता बंधारे व नवनिर्वाचित सरपंच कविता गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष गुलाब सोनवणे, एम. के. सोनवणे, माजी सरपंच शरद मुऱ्हे, देवराम सोनवणे, अजित गायकवाड, सखाराम बागडे, ज्ञानेश्वर गोसावी, आशा सोनवणे, तलाठी दिपक जाधव, ग्रामविकास अधिकारी कविता कोतवाल, बाळासाहेब सोनवणे, सर्व सदस्य व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.