राजगुरूनगर -खेड तालुक्यातील 83 शाळांपैकी 44 शाळांचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. तालुक्याचा निकाल 96.82 टक्के लागला मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल 10.65 टक्के वाढला आहे.
दहावीच्या परीक्षेसाठी तालुक्यातील 6 हजार 553 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 2349 विद्यार्थ्यांनी विशेष गुणावता, 2331 प्रथम श्रेणीत, 1348 द्वितीय श्रेणीत, तर 317 विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. केवळ 210 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.
शंभर नंबरी शाळा…
शिवाजी विद्यालय शेल पिंपळगाव. राष्ट्रीय विद्यालय कुरकुंडी. नवीन माध्यमिक विघालय, मरकळ. शासकीय पोस्ट बेसिक आश्रमशाळा कोंहिडे खुर्द. शिंगेश्व विद्यालय कुडे. मोहळ माध्यमिक प्रशाळा, पाळू. माध्यमिक विद्यालय पाडळी. शरदचंद्र विद्यालय वडगाव घेनंद. भैरवनाथ विद्यालय, वाकी. भामचंद्र विद्यालय, भांबोली. साने गुरुजी विद्यालय, खरपुडी. नुतन विद्यालय, रेटवडी. वसंतराव मांजरे विघालय, मांजरेवाडी. रेणुका विद्यालय, रासे. मॉडर्न हायस्कूल, भोसे. भैरवनाथ विघालय, कुरूळी. इंग्रजी माध्यम खेड. प्रियदर्शनी इंग्लीश मेडीयम स्कूल, वाकी. हनुमान माध्यमिक विघालय, चिंचोशी. पायस इंग्रजी माध्यम स्कूल. विद्यानिकेतन स्कूल. आर्या स्कूल, चांडोली. राजमाता जिजाऊ कन्याशाळा, तुकईवाडी.
आदर्श विद्यालय, आंबोली. सरस्वती विद्यालय, औदर. भीमाशंकर माध्यमिक विद्यालय, आव्हाट. त्रिमूर्ती विद्यालय, तिन्हेवाडी. इंदीराजी माध्यमिक विद्यालय, मोई. न्यू इंग्लिश स्कूल कोंहिडे बुद्रुक. मळू आई माध्यमिक विद्यालय, वाळद. भैरवनाथ विद्यालय करंज विहीरे. बाबुराव पिंगळे विघालय, गुळाणी. न्यू इंग्लीश स्कूल, निमगाव खंडोबा. चौधरी पाटील स्कूल मांडवळा. आनंद इंग्रजी मीडियम स्कूल, कुरूळी. स्वामी समर्थ इंग्रजी माध्यम स्कूल चाकण. हॉली एंजल इंग्रजी माध्यम स्कूल, भोसे. समर्थ माध्यमिक विद्यालय, चिंबळी. श्री समर्थ इंग्रजी माध्यम स्कूल, चिंबळी फाटा. भीमा इंग्रजी मीडियम स्कूल. नवोमेश स्कूल. प्रियदर्शनी विद्यालय. पवनसूत इंग्रजी माध्यम स्कूल मरकळ. लर्निंग ट्री इंग्रजी माध्यम. श्री ज्ञानेश्वर विद्यालय, आळंदी.