सातारा – जिल्ह्याला करोनाने मंगळवारी रात्री मोठा धक्का दिला. एकाच वेळी आतापर्यंतचे सर्वाधिक म्हणजे 188 जणांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. तर एकाच दिवशी बुधवारी नऊ करोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्येने साडेतीन हजारांचा आकडा पार केला. जिल्ह्यातील रुग्मसंख्या 3526 झाली आहे. तर करोनामुळे जिल्ह्यातील 128 जणांचा बळी गेला आहे.
जिल्ह्यात मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 188 जणांचे अहवाल करोनाबाधित आले आहेत. तसेच 4 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. या 188 बाधित रुग्णांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे आहे. जावळी तालुक्यातील दुदुस्करवाडी येथील 55 वर्षीय महिला, 33 वर्षीय पुरुष, 25 वर्षीय महिला, 2 वर्षाचे बाळ, 44 वर्षीय महिला,
52 वर्षीय पुरुष, 19 वर्षाचा युवक, 32, 53 वर्षीय महिला, 20, 19 वर्षाचा युवक, 67, 22 वर्षीय महिला, 36 वर्षाचा पुरुष, 80, 52, 52 वर्षाची महिला, दापवडी येथील 18 वर्षाची महिला, निपाणी मुरा येथील 21, 22 वर्षीय महिला., सातारा तालुक्यातील शाहुपूरी येथील 60 वर्षीय महिला, 13 वर्षाचा युवक, 18 वर्षाची महिला,
29 वर्षीय पुरुष, कोडोली येथील 50 वर्षीय पुरुष, रामकुंड येथील 10 वर्षाचा मुलगा, कासारी येथील 44 वर्षीय पुरुष, शनिवार पेठेतील 63 वर्षीय महिला, 69 वर्षीय पुरुष व 29 वर्षीय पुरुष, सोनापूर नागठाणे येथील 62, 68, 34 वर्षीय पुरुष, सदरबझार येथील 39 वर्षीय पुरुष, गडकरआळीतील 50 वर्षीय महिला, शिवराज पेट्राल पंप येथील 47 वर्षीय पुरुष, भैरवनाथ कॉलनीतील 33 वर्षीय पुरुष., कराड तालुक्यातील सैदापूर येथील
26 वर्षीय महिला, मलकापूर येथील 48 वर्षीय महिला, 62 वर्षीय पुरुष, 35, 85 वर्षीय महिला, 4 वर्षाचा बालक, 24 वर्षीय पुरुष, 30, 45, 16 वर्षाची महिला, आंबवडे येथील 33 वर्षीय पुरुष, वडगाव हवेली येथील 50, 86 वर्षीय पुरुष, 28 वर्षीय महिला, 6 वर्षाची बालिका, 18 वर्षाचा युवक, मसूर येथील 64 वर्षीय पुरुष, 60 वर्षाची महिला,
गोळेश्वरनगर येथील 34 वर्षीय पुरुष, आगाशिवनगर येथील 25 वर्षीय महिला, कालवडे येथील 2 वर्षाचे बाळ, चिखली येथील 30 वर्षीय महिला, रेटरे बुद्रुक येथील 40 वर्षीय पुरुष, 54 वर्षीय महिला, नांदगाव येथील 63 वर्षीय महिला, ओंढोशी येथील 39 वर्षीय महिला, 14 वर्षीय महिला, 2 वर्षाचे बालक, 10 वर्षाची मुलगी, मंगळवार पेठेतील 25 वर्षीय पुरुष, कार्वे येथील 36 वर्षीय पुरुष, चरेगाव येथील 7 वर्षाची मुलगी, गोवारे येथील 44 वर्षीय महिला, आगाशिवनगर येथील 30 वर्षीय पुरुष, उंब्रज येथील 64 वर्षीय पुरुष, कराड येथील 25 वर्षीय महिला, शनिवार पेठेतील 44 वर्षीय पुरुष,
कार्वे येथील 32 वर्षीय पुरुष, बुधवार पेठेतील 54 वर्षीय महिला, शनिवार पेठेतील 76 वर्षीय पुरुष, विद्यानगर येथील 22 वर्षीय महिला., पाटण तालुक्यातील नेसरवाडी येथील 60 वर्षीय पुरुष, मोरगिरी येथील 65 वर्षीय महिला, नेरले येथील 63 वर्षीय पुरुष, तारळे येथील 4 वर्षाचा बालक, आंबराग येथील 29 वर्षीय पुरुष, 28, 27 वर्षीय पुरुष, 50, 25, 20 वर्षीय महिला, म्हावशी येथील 40, 26 वर्षीय महिला, 4 वर्षाचा मुलगी, पाटण येथील 53
नऊ बाधितांचा मृत्यू
दुदुस्करवाडी येथील 67 वर्षीय पुरुष, सोनापूर नागठाणे ता. सातारा येथील 62 वर्षीय पुरुष या दोन करोनाबाधितांचा क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच कुरवली ता. फलटण येथील 59 वर्षीय पुरुष व नवसारी ता. पाटण येथील 60 वर्षीय पुरुषाचा खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती डॉ. गडीकर यांनी बुधवारी सकाली दिली.
तर आणखी पाच जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती सायंकाळी दिली. त्यानुसार रेठरे बुद्रुक येथील 75 वर्षीय पुरुष, सायगाव ता. जावळी येथील 70 वर्षीय पुरुष व वाठार ता. कोरेगांव येथील 64 वर्षीय पुरुष या तीन बाधितांचा क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
तसेच कराडच्या गुरुवार पेठेतील 36 वर्षीय पुरुष व भुतेघर ता. जावळी येथील 53 वर्षीय पुरुष या दोन बाधितांचा सातारा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यांचा खासगी प्रयोगशाळेतील अहवाल करोनाबाधित आला असल्याची माहिती डॉ. गडीकर यांनी दिली.