टाकवे बुद्रुक : मावळ तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. कधी निरभ्र तर कधी ढगाळ वातावरण. त्यात मनाला प्रसन्न करत क्षितिजावर सप्तरंगाची छटा घेत इंद्रधनुष्य अवतरले. दै. प्रभातचे वाचक प्रशांत जांभळे यांनी हे नयनरम्य दृश्य कॅमेऱ्यात कैद केले.