मंचर -पिंपळगांव- खडकी (ता. आंबेगाव) परिसरातील नागरिक, शेतकरी महावितरणच्या विविध समस्यांमुळे त्रस्त झाले आहेत. येथील महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ग्राहकांच्या समस्यांकडे लक्ष न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे युवासेना राज्य विस्तारक सचिन बांगर यांनी दिला आहे.
याबाबत शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने महावितरणचे कार्यकारी अभियंता हेमचंद्र नारखेडे यांची सोशल डिस्टन्सचे पालन करून भेट घेतली. यावेळी वीज ग्राहकांच्या विविध समस्यांबाबत विविध उपाययोजना करण्याबाबत निवेदन देण्यात आले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत पोखरकर, सुजित बांगर, प्रवीण पोखरकर, दत्तात्रय बांगर, ओंकार बांगर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.