टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी शास्त्रींसह ‘हे’ सहाजण रिंगणात

नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी विद्यमान प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह सहा जणांची नावे मुलाखतीसाठी निश्‍चित करण्यात आली आहे.

न्यूझीलंडचे प्रशिक्षक माईक हेसन, श्रीलंकेचे प्रशिक्षक व ऑस्ट्रेलियाचे ज्येष्ठ खेळाडू टॉम मुडी, वेस्ट इंडिजचे माजी अष्टपैलू खेळाडू व अफगाणिस्तानचे प्रशिक्षक फिल सिमन्स, भारतीय संघाचे माजी व्यवस्थापक लालचंद राजपूत व क्षेत्ररक्षणाचे माजी प्रशिक्षक रॉबिनसिंग यांचा त्यामध्ये समावेश आहे. या आठवड्यात ज्येष्ठ क्रिकेटपटू कपिलदेव यांच्या अध्यक्षतेखाली असलेली समिती यापैकी एकाची निवड करणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.