मुख्यमंत्री पूरबाधितांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत- धनंजय मुंडे

संग्रहित छायाचित्र...

फडणवीस सरकारची ‘महाधनादेशावर महाजनादेश यात्रा’

मुंबई: कोल्हापूर-सांगली जिल्ह्यात महापुरामुळे जनसामान्यांचे जनजीवन उद्धवस्त झाले असताना, मुख्यमंत्र्यांचे मंत्रीगण सदाभाऊ खोत आणि गिरीश महाजन यांची नौटंकी साऱ्या जगाने पाहिली आहे. पण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा मंत्र्यांना पाठीशी घालत असून मुख्यमंत्री महाराष्ट्रातील जनतेच्या आणि पूरबाधितांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आ. धनंजय मुंडे यांनी सरकारवर केली.

 राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्याच क्षणाला या दोन्ही मंत्र्यांचे राजीनामे घेणे आवश्यक होते. मात्र, मुख्यमंत्र्यांमध्ये ती हिम्मत नाही. हे सरकार दाखवते एक आणि करते एक, असा आरोप मुंडे यांनी केला.

या सरकारला पूरबाधितांशी तसेच दुष्काळग्रस्तांशी काही एक देणं घेणं नाही. यांना फक्त मतं हवी आहेत. पुन्हा मीच मुख्यमंत्री, एवढंच फडणवीस यांना सांगायचं आहे. या महापूमुळे लोकांना खाण्यासाठी अन्न नाही तर लहानग्यांना प्यायला दूध नाही. अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रा काढण्याऐवजी पूरग्रस्तांसोबत असण्याची गरज होती. आठ दिवसात परिस्थिती पूर्ववत आणण्यासाठी प्रशासनाने सजग असायला हवे होते, पण फडणवीस सरकार महाधनादेशावर महाजनादेश यात्रा काढत आहे, ही अत्यंत लाजिरवाणी बाब असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)