मुंबई – गेल्या तीन दशकांपासून फॅन्सच्या मनावर अधिराज्य गाजविणारा बॉलिवूड स्टार अजय देवगण आपल्या आगामी ‘रुद्रा : द एज ऑफ डार्कनेस’ या वेब सीरिजमधून ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करतो आहे. ही वेब सीरिज ब्रिटिश सीरिज ‘ल्युथर’चा हिंदी रिमेक असणार आहे.
नुकतंच अजय देवगणने या वेब सीरिजचा ऑफिशल ट्रेलर आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. ट्रेलर शेअर करताना अजय देवगणने लिहिले.. ‘प्रकाश आणि अंधार मधली रेषा… मी जिथे राहतो’. असे त्याने कॅप्शनमध्ये म्हटले आहे. ‘रुद्रा’ ही वेब सिरीज लवकरच डिस्ने हॉटस्टारवर तामिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम आणि बंगाली भाषेत प्रदर्शित होणार आहे.
View this post on Instagram
‘रुद्रा : द एज ऑफ डार्कनेस’ मध्ये अजय सोबत मुख्य भूमिकेत राशि खन्ना आणि ईशा देओल, अतुल कुलकुर्णी, अश्विनी काळसेकर, आशिष विद्यार्थी, सत्यदीप मिश्रा, तरुण गेहलोत हे देखील दिसणार आहेत. ‘रूद्रा’च्या ट्रेलवर बॉलिवूड सेलिब्रिटींपासून सामान्य लोकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.