नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातल्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष मोठ्या प्रमाणात प्रचार करताना दिसून येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर एकीकडे समाजवादी पक्षाकडून देखील जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. समाजवादी पक्षाचे (सप) अध्यक्ष अखिलेश यादव यांनी शनिवारी उत्तरप्रदेशप्रमाणेच गुजरातमध्येही सत्ताबदल होणार असल्याचे भाकीत केले. उत्तरप्रदेश निवडणुकीचा निकाल चकित करणारा नसेल.
एवढंच राहिलं होतं. देवालाही त्यांनी जातीचा दाखला देऊन टाकला. pic.twitter.com/Y3R27sNfvU
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 30, 2022
खरे आश्चर्य तर गुजरातमध्ये घडेल, असे त्यांनी म्हटले. तर दुसरीकडे भाजपाने सुद्धा आपली सत्ता टिकून राहण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. या निवडणुकीत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी देखील उत्तर प्रदेशमध्ये ‘महिलाराज’चं आश्वासन दिलं आहे.
यातच महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी निवडणुकीच्या मुद्यावरून ट्विट करत खोचक टोला लागावला आहे. आव्हाड यांनी योगी आदित्यनाथ यांचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये ते योगी म्हणतात,’मला कधीच दु:ख होत नाही. तसेच क्षत्रिय जातीत जन्म घेणं काही गुन्हा नाही.
या देशातली एक अशी जात आहे ज्यात खुद्द देवानं देखील जन्म घेतला आहे. आणि वारंवार जन्म घेतला आहे. त्यामुळे आपल्या जातीचा प्रत्येकाला अभिमान असायला हवा”असं म्हणत त्यांनी क्षत्रिय जातीविषयी भूमिका मांडली आहे. त्यांचा या भूमिकेवरूनच जितेंद्र आव्हाडांनी ट्विट करत योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘एवढंच राहिलं होतं. देवालाही त्यांनी जातीचा दाखला देऊन टाकला.’ असे जितेंद्र आव्हाढ म्हणाले आहेत.