मुंबई – सध्या जगात “आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (AI) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. आर्टिफिशियल इन्टेलिजन्सचा वापर केवळ अमेरिका आणि पाश्चात्य देशांमध्येच नव्हे, तर आपल्याही देशात आता वाढत आहे. हा आजच्या या डिजिटल युगातला सर्वात मोठा बदल आहे. आर्टिफिशल इंटेलिजन्स मुळे बऱ्याच गोष्टी ऍडव्हान्स झाल्याचे आपण पाहतो.
भविष्यामध्ये येणारे शतक फक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानाचे युग म्हणून ओळखले जाईल. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स वापर करून भविष्यामध्ये प्रत्येक क्षेत्र हे विकसित होऊ शकते. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने तयार केलेले अनेक फोटो तुम्ही पाहिले असतील.
यामध्ये आतापर्यंत देशाच्या महत्वाच्या व्यक्तींचे फोटो तयार करण्यात आले होते. भाजप, शिंदे गट (शिवसेना) आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे देखील एआय फोटो तयार करण्यात आले होते. हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. दरम्यान, यामध्ये आता ठाकरे गटाचा देखील समावेश झाल्याचं दिसून येत आहे.
उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांचे देखील आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने काही फोटो तयार करण्यात आले असून, यामध्ये हे सर्व नेते महाराष्ट्र पोलिसांच्या वेशात (वर्दित) दिसत आहेत. नेटकऱ्यांनी देखील यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्यात आहे.