सिंधुदुर्ग – आज मुस्लिम बांधवांचा महत्वाचा सण इद-उल-फित्र म्हणजेच रमजान ईद आहे. देशभरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. सामाजिक ऐक्य साधून अनेक जण मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा देत आहेत.
अशातच सिंधुदुर्ग येथील वेंगुर्ले तालुक्यातील अरवली सागरतीर्थ समुद्र किनाऱ्यावर वाळू शिल्प साकारून मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांनी हे वाळू शिल्प साकारले आहे. हे शिल्प साकारण्यासाठी त्यांनी दीड तास वेळ लागला असून सुमारे एक टन वाळूपासून हे शिल्प बनविण्यात आल्याचे रविराज यांनी सांगितले आहे.
दरम्यान, मागच्या एका महिन्यापासून सर्व मुस्लिम बांधवांचा उपवास सुरु होता. काल या काल या उपवासाचा शेवट झाला. रमजान ईद च्या पार्श्वभूमीवर गालबोट लागू नये म्हणून राज्यात सर्वत्र संवेदनशील ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे.