आखाडातील शेवटचा रविवार असल्याने 19 जुलैला मांसाहार पदार्थांच्या विक्रीसाठी जास्त वेळ द्या !

पुणे मटण दुकानदार आणि पुणे डिस्ट्रीक्‍ट बॉयलर ट्रेडर्स असो. ची मागणी

पुणे : आखाडातील शेवटचा रविवार 19 जुलै रोजी आहे. रविवारपासूनच जिल्हा प्रशासानने पुकारलेल्या लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता येणार आहे. दुकानदारांना सकाळी 8 ते दुपारी 2 या वेळेत चिकण, मटण आणि मासळीच्या विक्रीस परवानगी देण्यात आलेली आहे.

मात्र, या दिवशी आवर्जून मांसाहार केला जातो. त्यामुळे दुपारी 4 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत विक्रीसाठी परवानगी द्यावी. तसेच, शनिवारी (दि. 18) बकरे, कोंबड्या, मासळीच्या वाहतुकीसही परवानगी मिळावी, अशी मागणी पुणे मटण दुकानदार व पुणे डिस्ट्रीक्‍ट बॉयलर ट्रेडर्स असोसिएशनच्या वतीने करण्यात आली.

याबाबतचे निवेदन महापालिका आयुक्त विक्रमकुमार, विभागीय आयुक्ताचे विशेष कार्य अधिकारी सौरभ राव, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस आयुक्त के. व्यंकटेशन्‌ यांना देण्यात आल्याचे असोसिएशनच्या वतीने सांगण्यात आले

Leave A Reply

Your email address will not be published.