बारामतीत कोरोना रुग्णांच्या संख्येत होतेय वाढ…

जळोची : आज सकाळी ६९ पैकी ५९ जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले होते. उर्वरित १० अहवाल राखून ठेवण्यात आले होते. त्यापैकी तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. अशी माहिती डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.

कालचे उर्वरित दहा स्वँब नमुने अहवाल प्राप्त झाले असून त्यामधील तीन जण बारामती मधील कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत व आज एकूण ४६ स्वॅब नमुने तपासणीसाठी घेतले होते. त्यापैकी २८ निगेटिव्ह आले असून १८ नमुने यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. तो संध्याकाळी किंवा रात्री अपेक्षित आहे.

आज पॉझिटिव्ह आलेल्या तीन पैकी एक २४ वर्षीय तरूण सूर्यनगरी येथील रहिवासी असून देसाई इस्टेट
येथील १८ वर्षीय तरुण व नांदेड येथील एक ३३ वर्षीय ड्रायव्हर जो दोन दिवसापूर्वी बारामतीला आला होता असे तीन जण बारामतीमध्ये आज पॉझिटिव्ह आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.