नवी दिल्ली : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतली प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवी तिच्या विना मेकअप आणि जबरदस्त अभिनयासाठी ओळखली जाते. मात्र, साई पल्लवी सध्या तिच्या एका वक्तव्यामुळे वादात अडकली आहे. तिच्या आगामी विराट पर्वम या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान, साई पल्लवीने केलेल्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर नवा वाद निर्माण झाला आहे. साई पल्लवीने बॉलीवूड चित्रपट द काश्मीर फाइल्समध्ये दाखवलेल्या काश्मिरी पंडितांच्या हत्येच्या दृश्याची मॉब लिंचिंगशी तुलना केल्याने हा वाद सुरु झाला आहे.
”द काश्मीर फाईल्स या सिनेमात काश्मिरी पंडितांवर झालेला अन्याय आणि नरसंहार दाखवण्यात आला. धार्मिक वादावर बोलायचं झाल्यास गाईंची तस्करी करून घेऊन जाणाऱ्या मुस्लिम चालकाला मारण्यात आलं, जय श्रीराम या घोषणा देण्यात आल्या. काश्मीरमध्ये जे घडलं त्यात आणि मॉब लिंचिंगच्या घटनेत काय फरक आहे? दोन्ही घटना सारख्याच आहेत.” असे मोठे विधान साई पल्लवीने केले आहे. तिच्या या वक्तव्यावरून सध्या वातावरण तापले आहे.
“For me violence is wrong form of communication. Mine is a neutral family where they only taught to be a good human being. The oppress, however, should be protected. I don’t know who’s right & who’s wrong. If you are a good human being, you don’t feel one is right.”
– #SaiPallavi pic.twitter.com/o6eOuKvd2G— Hate Detector 🔍 (@HateDetectors) June 14, 2022
“मी लहान होते तेव्हापासून मला शिकवलं गेलं आहे की एक चांगली व्यक्ती होण्याचा प्रयत्न कर. त्यामुळे मी तटस्थ राहणं पसंत करते. ज्यांच्यासोबत अन्याय होतो आहे, त्यांची मदत करणं. कुणी लहान कुणी मोठं असं काही नसतं, सगळे समान आहेत असं ज्या घरात शिकवलं गेलं त्या वातावरणात मी वाढले आहे. डावे आणि उजवे यांच्याविषयी मी ऐकलं आहे. पण त्यांच्यात कोण योग्य कोण अयोग्य हे मला सांगता येणार नाही. मला काश्मिरी पंडितांवर अन्याय करणारे आणि मॉब लिंचिंग करणारे सारखेच वाटतात. तेव्हा जे घडलं त्यात आणि मॉब लिचिंगच्या घटनांच्या वेळी जे घडलं त्यात काय फरक आहे?, असा सवाल साई पल्लवीने केला आहे.
I liked #SaiPallavi.
Not any more.I never complained about her pimple filled cheeks, ugly shaped ass, bad hair styles.
But going forward I will hate her. As she tells killing a cow smuggler and killing Kashmiri Pundits are same.
She might say killing Terrorist and KP is same.
— Norbert Elekes (@N0rbertElekes) June 14, 2022
“जर तुम्ही व्यक्ती म्हणून चांगले नसाल तर डावे किंवा उजवे असाल तरीही न्याय कुठेच नसेल. पण व्यक्ती म्हणून तुम्ही चांगले असाल तर तटस्थ म्हणून विचार करू शकता,” असेही साई पल्लवीने म्हटले आहे.
She is told total wrong
— Mahantesh Tondihal (@MahanteshTondi5) June 15, 2022
साई पल्लवीच्या या वक्तव्यानंतर तिला सोशल मीडियावर टीकेला सामोरे जावे लागत आहे. यादरम्यान एका ट्विटर युजरने ट्विट करून म्हटले की, ‘तुम्ही जे काही बोललात ते खूप चुकीचे आहे’. दुसरीकडे, दुसर्या युजरने म्हटले आहे की, ‘मला साई पल्लवीची स्टाइल आवडली, दक्षिण भारतीय कलाकार कधीही सत्य बोलण्यास मागेपुढे पाहत नाहीत’. साई पल्लवीच्या वक्तव्यावर अशा संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.