प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 27 – गुजरातमधील गोध्रा दंगलीतील पीडिता बिल्कीस बानो यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने एसएसपीएमएस महाविद्यालयांच्या मैदानावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मूक निदर्शने करण्यात आली. यावेळी, राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस, महिला कॉंग्रेस, अल्पसंख्यांक विभाग, युवक कॉंग्रेस या सर्व सेलच्या पदाधिकाऱ्यांनी काळे वस्त्र परिधान करत केंद्राच्या धोरणा विरोधात निषेध व्यक्त करण्यात आला. शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रदीप देशमुख, मृणालीनी वाणी, किशोर कांबळे, सुषमा सातपुते, समीर शेख, शमीम पठाण, तनवीर शेख, चांद मणूरे, हमिदा शेख, परवीन तांबे, जरीना आपा, हलीमा आपा, जिशान कुरेशी, बादशाह नायकवडी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
भाजप सारखा पक्ष न्याय मोडून काढत असेल, तर हा न्यायालयाचा देखील अवमान असल्याचे मी या ठिकाणी नमूद करतो, अशा भावना शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी यावेळी व्यक्त केल्या.