मुंबई – न्यूझीलंड क्रिकेट मंडळाचा कित्ता गिरवताना बीसीसीआयनेही भारतीय क्रिकेटमधील स्त्री-पुरुष यांच्यातील भेद नष्ट केला आहे. (BCCI implements equal match fees for both men and women Cricketers) आता येत्या नोव्हेंबरपासून भारतीय महिला व पुरुष क्रिकेटपटूंना समान मानधन दिले जाणार असल्याची घोषणा सचिव जय शहा यांनी केली व महिला क्रिकेटपूंनाही दीवाळी भेट दिली. त्यांच्या या निर्णयाचे केवळ भारतीय क्रिकेट क्षेत्रातच नव्हे तर जागतिक स्तरावर प्रचंड कौतुक होत आहे.
भारतीय क्रिकेटमध्ये महिला आणि पुरुष खेळाडूंना यापुढे समान मानधन दिले जाणार आहे. महिला आणि पुरुष खेळाडूंमधील भेदभाव दूर करण्याच्या दृष्टीने हे आश्वासक पाऊल आहे. बीसीसीआयशी करारबद्द असलेल्या महिला खेळाडूंसाठी समान मानधन धोरण अवलंबिले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
I’m pleased to announce @BCCI’s first step towards tackling discrimination. We are implementing pay equity policy for our contracted @BCCIWomen cricketers. The match fee for both Men and Women Cricketers will be same as we move into a new era of gender equality in 🇮🇳 Cricket. pic.twitter.com/xJLn1hCAtl
— Jay Shah (@JayShah) October 27, 2022
बीसीसीआयने भेदभाव दूर करण्याच्या हेतूने हे पहिले पाऊल उचलल्याची घोषणा करताना मला आनंद होत आहे. करारबद्ध असणाऱ्या महिला खेळाडूंसाठी आम्ही समान मानधन धोरणाची अमलबजावणी करत आहोत. भारतीय क्रिकेटमधील स्त्री-पुरुष समानतेच्या नव्या युगात आपण प्रवेश करत आहोत. महिला आणि पुरुष खेळाडूंची सामना रक्कम आता समान असेल, असेही जय शहा यांनी सांगितले आहे.
असे असेल मानधन
महिला खेळाडूंनाही पुरुष खेळाडूंप्रमाणेच समान मानधन दिले जाणार आहे. त्यानुसार कसोटी सामन्यासाठी 15 लाख, एकदिवसीय सामन्यासाठी सहा लाख आणि टी-20 साठी तीन लाख मानधन असेल.
करार रकमेतही समानता येणार
बीसीसीआय पुरुष खेळाडूंसारखे महिला खेळाडूंसोबतही वार्षिक करार करते. पण दोघांच्या कराराच्या शुल्कातही मोठे अंतर आहे. समान सामना मानधनानंतर आता वार्षिक करार रकमेतही समानता आणण्यासाठी बीसीसीआय प्रयत्न करत असून लवकरच कराराची नवी रचना जाहिर केली जाणार आहे.
#T20WorldCup : आयर्लंडने केला दुसरा उलटफेर, वेस्ट इंडिजनंतर केली आता इंग्लंडची शिकार
सध्या केंद्रिय करार पद्धतीनूसार A+ गटातील पुरुष खेळाडूंना वर्षाला 7 कोटी रुपये मिळतात. महिला खेळाडूंसाठी A+ हा गटच नाही. पुरुष खेळाडूंना A गटासाठी वर्षाला 5 कोटी तर महिला खेळाडूंना केवळ 50 लाख रुपये मिळतात. पुरुषांच्या B गटासाठी 3 कोटी, तर C गटात 1 कोटी रुपये मिळतात. महिलांच्या B गटातील खेळाडूंना 30 लाख रुपये तर, C गटासाठी 10 लाख रुपये मिळतात.