#T20WorldCup | पराभव सहन न झाल्याने पाकिस्तानच्या शादाब खानला रडू कोसळले, व्हिडिओ व्हायरल!

T20 WorldCup – पाकिस्तान संघाने टी-२० विश्वचषकात सलग दोन सामने गमावले आहेत. त्यामुळे त्यांचे आता स्पर्धेतील आव्हान जरा कठीण वाटत आहे. आगोदर भारत आणि आता झिम्बाब्वेने पाकिस्तान संघाचा पराभव केला आहे. या दोन्ही सामन्यात पाकिस्तानला सामान्यांच्या शेवटच्या चेंडूवर सामने गमवावे लागले आहेत. त्यामुळे त्यांच्या संघावर आता स्पर्धेतून बाहेर जाण्याची परिस्थिती ओढवली आहे. दरम्यान झिम्बाब्वेविरुद्ध सामना गमावल्यानंतर पाकिस्तानचा अष्टपैलू शादाब खान भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
पावसाचं चाललंय तरी काय! टी-२० विश्वचषकातील दोन्ही सामने पाण्यात, गुणतालिकेत झाला मोठा फेरबदल
पाकिस्तान संघाला झिम्बाब्वेविरुद्ध लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. पराभवाचं दुःख सहन न झाल्याने संघाचा अष्टपैलू खेळाडू व संघाचा उपकर्णधार शादाब खान याला रडू कोसळले. त्याचा हाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या सामन्यात झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करताना १३० धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करणे पाकिस्तानसाठी अवघड नव्हते, परंतु झिम्बाब्वेच्या दमदार क्षेत्ररक्षण आणि भेदक गोलंदाजीने या सामन्यात मोठा उलटफेर घडवला.
View this post on Instagram
पाकिस्तानला स्पर्धेतील ( T20 WorldCup ) सलग दुसरा सामना गमवावा लागल्याने संघ व्यवस्थापनावर व कर्णधार बाबर आझमवर जोरदार टीका होत आहे. पाकिस्तानच्या माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनेही संघ व्यवस्थापन आणि बाबर आझमवरला धारेवर धरले. विश्वचषक स्पर्धा सुरु होण्याअगोदर पाकिस्तान संघ मजबूत वाटत होता. मात्र मागील दोन सामन्यात संघाच्या फलंदाजीवर मोठे प्रश्न उपस्थित झाले आहेत.





