स्मार्टफोन विक्रीत घसरणीचे संकेत

सीसीएस इन्साइटच्या अहवालात माहीती सादर

Madhuvan

नवी दिल्ली – चालू वर्ष (2020) मध्ये उद्योग क्षेत्रांसाठी सर्वाधिक अडचणीचे ठरणार आहे. याचे प्रमुख कारण आहे, कोरोनो विषाणूचा होत असणारा फैलाव या संकटात जवळपास 205 देशांना मोठा फटका बसला आहे. याचा येत्या काळातही आणखीन देशांना नुकसान होण्याची भीती आहे. जगभरात लाखो लोकांना कोरोनाच्या विळख्यात आले आहेत.

तंत्रज्ञान क्षेत्रासोबत स्मार्टफोन क्षेत्रालाही या वर्षात सर्वाधिक नुकसान सहन करावे लागणार असल्याचे संशोधन कंपनी सीसीएस इन्साइटच्या अहवालात करण्यात आले आहे. अहवालाच्या आकडेवारीनुसार चालू वर्षात एकूण 157 कोटी स्मार्टफोन विक्री होण्याचे संकेत आहेत. जी मागील वर्षाच्या तुलनेत 13 टक्‍क्‍मयांनी कमी राहणार आहे. विक्रीच्या बाबतीत मागील देशातील ही सर्वात कमी आकडेवारी राहणार आहे. आतापर्यंत फक्त 126 कोटी स्मार्टफोन विक्री झाली आहे. जी मागील वर्षात 141 कोटीची विक्री राहिली होती.

कोरोनाच्या संकटामुळे दुसऱ्या तिमाहीत मोठी समस्या निर्माण होणार आहे. सदरच्या अहवालात सांगितले आहे की, मागणी आणि पुरवठा यांच्यात मोठी अडचण तयार होण्याच्या कारणामुळे शिपमेंटमध्ये 29 टक्कयांची घसरण होण्याचे अनुमान आहे. विक्रीत सुट्टयांच्याही काळात परिणाम झाला नाही.

या कालावधीत जगातील ग्राहक लॉकडाउनच्या कारणामुळे घरामध्ये मागणी समाप्त झाली आहे. लॉकडाउनच्या कारणामुळे पुरवठा करण्यात येणारी साखळी तुटण्याची शक्‍मयता आहे. यामुळेच देशातील ग्राहकांना स्मार्टफोन खरेदीवर प्रभाव पडला आहे. भारतासंदर्भात चर्चा करण्यात आल्यावर काही ठराविक ग्राहकांनी फोनची खरेदी केली आहे. आणि काही जणांनी पैसे जमा करुनही त्यांना स्मार्टफोन मिळालेले नाहीत.

या कालावधीत फोन खरेदी रोखण्यासाठी हे लॉकडाउनच्या कारणानं आर्थिक स्थितीत गडबडली आहे. यामध्ये फोनच्या व्यतिरिक्त अन्य घरगुती वस्तूंची खरेदी करण्यावर भर दिली आहे. अहवालात दिलेल्या माहितीनुसार 2019 च्या तुलनेत काही प्रमाणात ही स्मार्टफोन अधिक विकले आहेत. परंतु समाधानांची बाब म्हणजे मार्केटमध्ये वेगाने रिकव्हरी झाली आहे. चालू वर्षात मागणी आणि पुरवठा कमी होण्याच्या परिणामामुळे आगामी वर्ष 2021 मध्ये मागणी 12 टक्कयांनी वधारण्याची शक्‍मयता आहे, जी 2022 पर्यंत कायम राहण्याचे अनुमान आहे.

5जी चा वेग
वर्ष 2022 मध्ये शिपमेंटचा आकडा 200 कोटीच्या पुढे जाण्याचे अनुमान आहे. तसेच स्मार्टफोन निर्मिती करणाऱया कंपन्या स्वस्त स्मार्टफोन तयार करण्यावर भर देण्याची शक्‍मयता आहे. ज्यामध्ये 5 जी मध्यम आणि फ्लॅगशिप स्मार्टफोनही स्वस्त होणार आहेत. अहवालच्या दाव्यानुसार 2024पर्यंत 5 जी स्मार्टफोन सर्वाधिक विकण्याचे अनुमान आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.