Siddharth Chandekar: अभिनेत्री मिताली मयेकर (Mithali Mayekar) व सिद्धार्थ चांदेकर ( Siddharth Chandekar) हे दोघेही सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असल्याचे पाहायला मिळते. अनेक ठिकाणी दोघेही फिरण्यासाठी जातात. दोघेही सोशल मीडियावर त्यांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करतात. मात्र अनेकदा त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. नुकतेच मितालीने शेअर केलेल्या फोटोवरून तिला ट्रोल करण्यात आले. परंतु यावेळी सिद्धार्थने देखील ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिल्याचे पाहायला मिळाले.
सिद्धार्थ व मितालीने एकत्र केलेल्या जाहिरातीचा व्हिडीओ दोघांनीही इन्स्टाग्रामवर शेअर केला. या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. काहींनी मितालीला ट्रोल करण्याचा प्रयत्न केल्याचे बघायला मिळाले. या व्हिडीओवर एका महिलेने मितालीला बिकिनी घाल अशी कमेंट केली होती. बायकोला बिकीनी घाल असे म्हणणाऱ्या महिलेला सिद्धार्थने सडेतोड उत्तर दिले आहे. सिद्धार्थने मितालीला ट्रोल करणाऱ्या महिलेला “तुमचे अहो तुम्हाला काय म्हणतात हे ताई येथे सांगू नका”, असे उत्तर दिले आहे.
View this post on Instagram
सिद्धार्थच्या या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अनेकांनी सिद्धार्थच्या या उत्तराचे कौतुक केले आहे. दरम्यान, यापूर्वी अनेकदा मितालीला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे. तेव्हाही सिद्धार्थने मितालीला ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांना सुनावल्याचे पाहायला मिळाले होते. दरम्यान, सिद्धार्थचा ‘झिम्मा 2’ चित्रपट प्रदर्शित झाला असून याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यानंतर आता सिद्धार्थचा ‘ओले आले’ हा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यात नाना पाटेकर, सायली संजीव यांचीही प्रमुख भूमिका आहे.