सिद्धार्थ मल्होत्रा फक्‍त चांगला मित्र – तारा सुतारिया

“स्टुडंट ऑफ द इयर 2’मधून पदार्पण करणाऱ्या तारा सुतारियाचे सिद्धार्थ मल्होत्राबरोबर नाव जोडले जायला सुरुवात झाली आहे. मात्र सिद्धार्थ मल्होत्राबरोबर डेटिंग करत असल्याचे ताराने नाकारले आहे. सिद्धार्थ मल्होत्रा ऐवजी टायगर श्रॉफवरच आपला क्रश असल्याचे तिने म्हटले आहे. टायगरबाबत काही सिक्रेट राहिलेले नाही, हे सगळ्यांनाच माहिती आहे, असे ती म्हणाली. “स्टुडंट…’मध्ये तारा आणि टायगर बरोबर आहेत. एक ऍक्‍टर म्हणून टायगरच्या दोन बाजू तुमच्या समोर येतील. पण जेंव्हा तो समोरच्याबरोबर कम्फर्टेबल असतो, तेंव्हा तो एकच दिसतो, असे तारा म्हणाली. त्यामुळे त्या दोघांमध्ये जवळीक वाढणे स्वाभाविक होते.

मात्र सिद्धार्थबरोबर डेटिंगची निव्वळ अफवाच आहे. सिद्धार्थ आणि मी एकत्र मोठे झालो. त्यामुळे आम्ही नेहमी बरोबर असतो. सध्या तो खूप बिझी असतो. आमच्यामध्ये बऱ्याच गोष्टी समान आहेत. पण आम्ही दोघे खूप चांगले मित्र आहोत. आम्ही डेटिंग वगैरे काही करत नाही आहोत. ही एक अफवा आहे, एवढे लांबलचक स्पष्टिकरण देऊन ताराने हा विषय मिटवण्याचा प्रयत्न केला. पण टायगरबाबत काय ? हा प्रश्‍न अजून शिल्लक राहिलाच आहे…!

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.