रश्मिका मंदानाला तमिळनाडूची सूनबाई बनायचे आहे. लग्न झाल्यावर तमिळनाडूमध्ये स्थायिक होण्याचा तिचा विचार आहे. कारण तमिळनाडूतील प्रथा, परंपरा, संस्कृती आणि विशेषतः तेथील खाद्यपदार्थांच्या ती अगदी प्रेमात पडली आहे.
View this post on Instagram
हे तमिळी खाद्यपदार्थ नेहमीच खायला मिळावेत, यासाठी आपले लग्न एखाद्या तमिळी युवकाबरोबर व्हावे, अशी तिची अपेक्षा आहे. रश्मिका मंदानाचा जन्म कर्नाटकात झाला आहे. तिने कन्नड, तमिळ आणि तेलगू सिनेमात काम केले आहे.
View this post on Instagram
सिद्धार्थ मल्होत्राचा लीड रोल असलेल्या “मिशन मजनू’तून ती हिंदीमध्ये पदार्पण करणार आहे. याशिवाय हिंदीमध्ये ती बिग बी अमिताभ बच्चन यांच्याबरोबर “गुडबाय’मध्ये दिसणार आहे. याशिवाय बच्चन यांच्याबरोबर आणखी एका सिनेमातही तिला रोल मिळाला आहे. पण अद्याप त्याचे शीर्षक ठरलेले नाही.
View this post on Instagram
तिला तमिळनाडूची बहुरानी बनायचे आहे, हे जरी खरे असले तरी त्यादृष्टीने तिलाच हालचाली करायला लागणार आहेत. तिने अद्याप एखादा तमिळी बॉयफ्रेंड पटवला असेल, तर तिचे काम सोपे होईल. नाहीतर एकदा हिंदीमध्ये प्रस्थापित झाल्यावर तिची तमिळनाडूची क्रेझ कमी होईल आणि तिला मुंबईची बहुरानी बनावे लागेल.