बॉलीवूडमधील युवा अभिनेत्री श्रद्धा कपूरने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर चाहत्यांमध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. या अभिनेत्रीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. यात ती बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेता जितेंद्र यांच्या अंदाजात डान्स करताना दिसत आहे.
तिचा हा व्हिडीओ “छिछोरे’ चित्रपटाच्या सेटशी संबंधित आहे. जिथे अभिनेत्री मेकअप रूममध्ये हा डान्स करत मस्तीच्या मूडमध्ये असल्याचे दिसते. या व्हिडीओला आतापर्यंत हजारांहून अधिक लाइक्स आणि कमेंटस् आल्या आहेत. श्रद्धा कपूरचा हा व्हिडीओ तिच्या मेकअप आर्टिस्टने “छिछोरे’ चित्रपटाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शेअर केला आहे. या व्हिडीओत श्रद्धा खूपच क्युट दिसत आहे.
विशेष म्हणजे, अभिनेता सुशांतसिंह राजपूत आणि श्रद्धा कपूर यांच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल 100 कोटींहून अधिक गल्ला जमविला होता. या व्हिडीओत श्रद्धाने ब्राऊन टॉप आणि प्रिंटेड स्कर्ट घातल्याचे दिसत आहे. तसेच तिने घातलेल्या कॅपमुळे तिचा अंदाज खूपच जबरदस्त दिसत आहे.
खुद्द श्रद्धानेही हा व्हिडीओ यापूर्वी एकदा शेअर केला होता. यात तिच्यासोबत सुशांतसिंह राजपूत, वरुण शर्मा आणि “छिछोरे’चे अन्य कलाकार सेटवर खूप मस्ती करत असल्याचे शूट करण्यात आले आहे.