नवी दिल्ली :भाजपचे खासदार अनंतकुमार हेगडे यांना महात्मा गांधींविरूद्ध केलेल्या टीकेबद्दल कारणे दाखवा नोटीस वाजवण्यात आली आहे. कर्नाटक भाजपा प्रमुख नलिनकुमार कातिल यांनी हि माहिती दिली.
माध्यमांच्या वृत्तानुसार हेगडे यांनी बंगळुरुच्या एका कार्यक्रमात स्वातंत्र्याची लढाई महात्मा गांधींनी इंग्रजांच्या सहमतीने आणि सहकार्याने लढवल्याचा दावा केला होता. गांधीजींची स्वातंत्र्य चळवळ एक नाटक असल्याचेही हेगडे म्हणाले होते.
अनंतकुमार हेगडे यांनी केलेल्या वक्तवव्यावर काँग्रेसने जोरदार आक्षेप घेतला आहे. पंतप्रधान मोदींनी हेगडेंच्या वक्तवव्यावर संसदेत सप्ष्टीकरण द्यावे. तसेच हेगडे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत मताच्या ध्रुवीकरणासाठी भाजपचे नेते असे वक्तव करीत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते आनंद शर्मा केला आहे. ते संसद परिसरात पत्रकारांशी बोलत होते.
शर्मा म्हणाले, महात्मा गांधी आणि स्वातंत्र्य चळवळीचा यापेक्षा दुसरा कोणताच अपमान असू शकत नाही. हेगडे यांच्यावर सरकार जर कारवाई करणार नसेल तर, भाजपचा खरा चेहरा समोर येईल. “भाजप नेत्यांनी स्वातंत्र्य लढ्याला विरोध केला होता.” त्यामुळे त्यांच्याकडून अशी विधाने करण्यात येतात असा द्वा त्यांनी केला.
हेगडेंच्या टीकेबाबद्दल भाजपवर निशाणा साधत कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले कि, ज्यांचा ‘कट्टरतेवर’वर विश्वास असतो ते सत्याग्रह कधीच स्वीकारू शकत नाहीत.”हा मोदींचा ‘भारत’ आहे जिथे रोज बापूंच्या विचारांवर हल्ला केला जातो.