शॉर्ट फिल्म कॉर्नर : हिंसा नही, सन्मान सही

या लघुपटाची सुरुवात दोन वरिष्ठ कर्मचारी सरिता व प्रशांत यांच्या संभाषणातून होते. ते दोघे एका हॉटेलमध्ये चहा पीत असतात. प्रशांत सरिताला म्हणतो, अरे, महिला आहे म्हणून काय झाले. काम करण्यासाठी पैसे दिले जातात. मग आदर कशाला करायचा. यानंतर कनिष्ठ कर्मचारी लक्ष्मीबाई बोलताना दाखवली की, तुम्ही पैसे देता हे आम्ही मान्य करतो. परंतु, आदरावर सर्वांचाच हक्क आहे.

सरिता म्हणते कि, आणि पंख फुटत आहेत असे वाटले की चार लोकांसमोर अपमान करायलाच हवा. यासाठी मोठ्या आवाजात बोलायलाच हवे. त्यांच्याकडून आपल्याला कामही व्यवस्थित करून घ्यायचे आहे. हे ऐकून प्रशांतही सरिताला होकार देतो. यावर लक्ष्मीबाई म्हणते, चार लोकांसमोर अपमानित होणे चांगले वाटत नाही. आत्मविश्‍वास तुटून जातो. प्रशांत म्हणतो की, हे बघा जर इथे काम करायचे असेल तर मालकाच्या नियंत्रणाखालीच राहावे लागेल. यापुढे लक्ष्मीबाई म्हणते, वरिष्ठ कर्मचारी तर मदत करण्यासाठी, काम शिकवण्यासाठी असतात. त्यांचीच भीती वाटली तर कोणी कसे काम करेल. मग सरिता म्हणते, आणि नियंत्रण कसले. हेच बरोबरच आहे. आपण मारत तर नाही ना. भीती वाटल्याशिवाय कामेही होत नाही. काम तो दंडे कि जोर से निकलता है. यावर लक्ष्मीबाई म्हणते, भीतीने काम कसे होईल? आणि भीतीच्या वातावरणात कामातही लक्ष लागत नाही.

कामावर महिलांशी अशाप्रकारची वागणूक मौखिक हिंसेच्या प्रकारात येते. अशी वर्तणूक एक प्रकारचा मानसिक छळच असतो. देशात आज अनेक कामगारांविषयी कायदे बनविण्यात आले आहेत. परंतु, कामगार मंडळी त्याविषयी हवे तितके जागरूक नाहीत. यामुळे अनेक कामगारांचा कामाच्या ठिकाणी शारीरिक आणि मानसिक छळ होतो. याविरुद्ध कोणी आवाज उठवला तरीही त्या व्यक्तीला मिळत नाही. अथवा पैसे देऊन गप्प केले जाते. आपल्या संविधानाने सामान काम समान वेतनाचा हक्क दिला असला तरीही तो अंमलात येताना दिसत नाही. काही ठिकाणी स्त्रीची पात्रता असूनही केवळ महिला असल्या कारणाने अधिक वेतन, बढती नाकारण्यात येते. याचा परिणाम त्यांच्या मनोबल आणि कामावर दोन्हीवर होतो. याशिवाय तुमच्या व्यापारावरही परिणाम पडतो.

– श्वेता शिगवण

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)