सन्मान देण्याऐवजी शेतकऱ्यांच्या कष्टांची किंमत राज्य सरकारने कवडीमोल केलीयं – राष्ट्रवादी

पुणे – शेतकरी सध्या नापिकीमुळे कर्जात अडकलेला आहे. त्यातच दुष्काळामुळे खरिपाचं पिकही हाती लागले नाही. अशा परिस्थिततीत सरकारकडून मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची सरकारकडून थट्टा सुरू असल्यांच चित्र आहे. कारण माढा तालुक्यातील शेतकऱ्याला केवळ चार रूपयांचं खरीप अनुदान मिळालं आहे.

यासंबंधी राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ट्विट करत राज्यातील भाजप सरकार टीका केली आहे. शेतकऱ्याला सन्मान देण्याऐवजी त्यांच्या कष्टांची किंमत राज्य सरकारने कवडीमोल करून ठेवली आहे, अशी घणाघाती टीका भाजप सकरारवर केली आहे.

राष्ट्रवादीने ट्विट करत म्हटलं आहे की, “या सरकारची शेतकऱ्यांप्रतीची बेगडी आस्था एका घटनेने उघड झाली आहे. माढ्यातील एका शेतकऱ्याला खरीप पीकासाठी शेतकऱ्याला दिलेलं अनुदान आहे फक्त ४ रुपये.. अशाप्रकारे किरकोळ अनुदान देऊन सरकारने बळीराजाचा अपमानच केलाय.”

तसेच, अशा असंवेदनशील सरकारबाबत शेतकऱ्याकडून आक्रोश व्यक्त होणे साहजिकच आहे, असं देखील राष्ट्रवादीने म्हटलं आहे. तर आता खात्यात टाकलेल्या या अनमोल रकमेला काढण्याची व्यवस्थाही सरकारने करावी, अशी हतबलता या शेतकऱ्याने व्यक्त केली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.