साडी खरेदी साठी ‘स्वामिनी’ ही पुणेकरांची पहिली पसंती झाली आहे, शिवाय पुण्याबाहेरील लोक सुद्धा खास ‘स्वामिनी’मध्ये साडी खरेदी करण्यासाठी कायम येत असतात. संपूर्ण देशातील विविध राज्यांच्या सुंदर आणि मनमोहक साड्या स्वामिनीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे असंख्य ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेली ‘स्वामिनी’ दरवर्षीप्रमाणे यंदाच्या दिवाळीमध्येसुद्धा तुमच्यासाठी घेऊन आली आहे आकर्षक आणि नाविन्यपूर्ण साड्यांचे अनोखे कलेक्शन, ज्यामध्ये आहे बनारसी, चंदेरी, मस्तानी, शिफॉन, पश्मीना सिल्क, आणि कांजीवरम साडीसहित नवरीचा शालू, पैठणीपासून ते देण्याघेण्याच्या सुंदर साड्या उपलब्ध. याशिवाय स्वामिनीमध्ये आहे लग्नबस्त्याची खास सोय.
केवळ साडी विक्री हेच उदिष्ट ध्यानात न ठेवता प्रत्येक साडीला नात्यांची गुंफण देऊन त्यातून आपुलकी, प्रेम, जिव्हाळा वृद्धिंगत करण्याचे कार्य केवळ स्वामिनीतच केले जाते. भारतीय कला, संस्कृती जपण्याच्या दृष्टीने अत्यंत दुर्मिळ होत चाललेले वस्त्रवैभव ‘स्वामिनी’मध्ये जपलेले आहे. अनेक नाविन्यपूर्ण डिझाइन, वेगवेगळे रंग आणि पॅटर्न असलेल्या साड्या आपल्याला इथे खरेदी करता येतील. ‘स्वामिनी’चे संस्थापक श्री. रियाज भाई शेख नेहमी म्हणतात की आम्ही केवळ साड्याच नाही तर त्या माध्यमातून महिलांना खुलवणारे वस्त्रवैभव निर्माण करतो. प्रत्येक ग्राहकाची आवड लक्षात घेऊनच स्वामिनीमध्ये साड्यांचे कलेक्शन केले जाते.
रियाज भाई शेख यांच्यासोबत त्यांचे दोन्ही चिरंजीव नावेद आणि जावेद शेख वडिलांचा हा वारसा व्यावसायापलीकडे नेण्यासाठी काही उदिष्ट डोळ्यासमोर ठेवून कार्य करत आहेत. निवृत्त शिक्षकांना खास गुरुदेवता साडीने सन्मानित केले जाते. दुकानात येणार्या 80 वर्षापुढील सर्व स्त्रियांना जिजाऊ पुरस्कार देऊन सन्मानित करणारे देशातील कदाचित हे पहिलेच दुकान असावे. याचबरोबर निवृत्त महिला पोलिसांना अष्टभुजा साडी प्रदान करून त्यांच्या कामाप्रती गौरव व्यक्त केला जातो.
युट्युबबरोबरच स्वामिनी फेसबुक आणि इंन्स्टाग्रामच्या माध्यमातून ग्राहकांसाठी वैविध्यपूर्ण कलेक्शन प्रसिद्ध करत असते. स्वामिनीच्या युट्युब चॅनेलवरून साड्यांचा इतिहास सांगणारी जीवनदायिनी ही मालिका प्रसारित केली जाते. याचबरोबर सणांशी निगडीत माहितीपूर्ण व्हिडीओ जसे की ‘दिवाळी मसाला मिक्स धमाका’ असे व्हिडीओज स्वामिनी आपल्या रसिक प्रेक्षकांसाठी आणि जिज्ञासू ग्राहकांसाठी घेऊन येत असते.
पारंपरिक नववारीचा वारसा स्वामिनी अत्यंत कुशलतेने जतन करते. याचबरोबर पुण्यातील ‘स्वामिनी’ हे भारत सरकारचे सिल्कमार्कप्राप्त साड्यांचे दालन आहे. इथली प्रत्येक साडी स्त्रीच्या मनामनाला भावणारी अशी असते म्हणूनच स्वामिनीने प्रत्येकीच्या मनामनात अढळ स्थान मिळवले आहे.
स्वमिनीने कायमच आपल्या ग्राहकांच्या आवडी-निवडीला आणि सुरक्षिततेला प्राधान्य दिले आहे त्यामुळे सध्याच्या कठीण काळात सुद्धा आपल्या ग्राहकांच्या सुरक्षिततेची संपूर्ण काळजी घेण्यासाठी स्वामिनी सज्ज आहे. सर्व कर्मचार्यांचे लसीकरण झालेले आहे. शोरूम वेळोवेळी सॅनिटाईज केले जाते. सुरक्षिततेचे सर्व आवश्यक नियम पाळले जातात.
येत्या दिवाळी आणि लग्नसमारंभासाठी, अगदी तुम्हाला आवडेल असे स्वमिनीचे आकर्षक कलेक्शन पाहायला आणि प्रियजनांना सणाची भेट देण्यासाठी साडी खरेदी करायला साड्यांची महाराणी ‘स्वामिनी’ येथे नक्की भेट द्या!