जयपूर – पती आणि पत्नीचं नातं हे विश्वासावर अवलंबून असतं. मात्र अनेकदा या विश्वासाला कधी पत्नीकडून तर कधी पतीकडून सुरंग लावला जातो. वास्तविक पाहता, पत्नीचं रक्षण करण्याची जबाबदारी पतीची असते. मात्र जयपूरमध्ये एका पतीने आपल्या पत्नीला पैशांच्या मोबदल्यात मित्राच्या हवाली केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
आपल्या मित्राकडून 500 रुपये घेऊन पत्नीवर बलात्कार करण्याची परवानगी आरोपी पतीने दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पैशांची गरज असल्यामुळे या नराधम पतीनं आपल्या मित्राकडून 500 रुपये घेतले आणि त्या मोबदल्यात आपल्या पत्नीचा ताबा त्याच्याकडे दिला. त्यानंतर मित्राने महिलेला निर्जन स्थळी नेत तिच्यावर अत्याचार केला.
दरम्यान या घटनेनंतर महिलेनं तक्रार केल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यानंतर पोलिसांनी पती आणि त्याच्या मित्राला अटक केली आहे.