दिल बेचारा’ हा सुशांत सिंह राजपूत शेवटचा सिनेमा होता. 14 जून 2020 रोजी सुशांतने आत्महत्या केल्यानंतर “दिल बेचारा’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केला गेला होता. मात्र या सिनेमातील काही दृश्यांमध्ये सुशांत सिंहचा आवाज त्याचा स्वतःचा नाही हे फार कमी जणांना माहीत असेल.
त्याच्या अकाली निधनामुळे डबिंगचे काम अर्धवट राहिले होते. हे डबिंगचे काम एका “आरजे’ ने पूर्ण करून दिले होते.”आरजे’ आदित्य ज्याने सुशांतच्या आवाजात हे डबिंग केले होते. डबिंगसाठी निर्मात्यांनी “आरजे’ आदित्यची मदत घेतली आणि त्याने सुशांतचे डायलॉग डब करण्यास मदत केली.
सुशांतने काम केलेल्या “एम. एस. धोनी’ मधील काही डायलॉगचा आधार घेऊन आदित्यने सुशांतचे डायलॉग त्याच्या आवाजात म्हणण्याचा प्रयत्न केला. “दिल बेचारा’ रिलीज झाला आणि सगळ्यांना खूपच आवडला. सुशांतचे डायलॉग डबिंग करण्यात आले असल्याचे कोणाच्याही लक्षात आले नाही. “आरजे’ आदित्यच्या एका इंटरव्यूमधून ही बाब उघड झाली.