पुणे -ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या भारताच्या महिला बॉक्सिंगपटू मेरी कोम (51किलो) आणि लोव्हलिना बोरगोहेन (69 किलो) यांनी पुण्यातील कमांड हॉस्पिटलमध्ये करोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. पुण्याच्या आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्यूटमध्ये एलिट महिला बॉक्सर राष्ट्रीय शिबिर सुरू आहे. हे शिबिर जुलैपर्यंत चालणार आहे.
ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरलेल्या बॉक्सिंगपटूंसाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मेरी कोम सहा वेळा विश्वविजेती असून, लोव्हलिनाने दोन वेळा विश्व चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकले आहे. या दोघी 5 मे रोजी पुण्यात दाखल झाल्या होत्या. मेरी कोम आणि लोव्हलिना यांच्यासह कोचिंग आणि सपोर्ट स्टाफ टीमच्या चार सदस्यांना करोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.
तथापि, सिमरनजीत कौरही येथे प्रशिक्षणासाठी येणार आहे. पण विलगीकरणाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर तिला सहभागी करून घेण्यात येणार आहे. सध्या ती बेल्लारीच्या इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्टस येथे प्रशिक्षण घेत आहे.