धक्कादायक! करोनाबाधित पत्नीचा रुग्णालयात मृत्यू; पतीने परस्पर मृतदेह पळवला

बीडमधील घटना; पतीविरोधात गुन्हा दाखल

बीड : राज्यात करोनाबाधितांची संख्या थोड्या प्रमाणात कमी झाली असली तरी मृतांचा आकडा काही कमी होत नाही. दरम्यान, अशाच करोनामुळे मृत झालेल्या पत्नीचा मृतदेह पतीने  रुग्णालयातून परस्पर पळवल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये घडली आहे. मात्र मृत महिलेच्या भावाने रुग्णालय प्रशासनाचे आरोप चुकीचे असल्याचे सांगत अँटिजेन चाचणी निगेटिव्ह आल्याने मृतदेह घरी नेल्याचा सांगितले आहे.

मृत झालेल्या पत्नीचा मृतदेह पळवल्याच्या आरोपाखाली पतीविरोधात गुन्हा दाखल केल्याची घटना  इतकंच नाही तर घरी अंत्यसंस्कार न करता मृतदेह पुन्हा रुग्णालयाच्या स्वाधीन करुन अंत्यसंस्कार केल्याचा दावाही केला आहे.

बीडच्या जिल्हा रुग्णालयात गेवराई तालुक्यातील कुंभारवाडी इथल्या सुरवसे नामक एका महिलेला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. त्यानंतर नातेवाईकांनी तिचा मृतदेह परस्पर घरी नेल्याचा आरोप करत रुग्णालयातील परिचारिका अर्चना पिंगळे यांच्या तक्रारीवरुन बीड शहर पोलीस ठाण्यात महिलेच्या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या महिलेचा सोमवारी  पहाटे पाच वाजता मृत्यू  झाला. त्यानंतर डॉक्टर आणि नर्स यांची नजर चुकवून पती रुस्तुम सुरवसे यांच्यासह नातेवाईकांनी मृत महिलेचा मृतदेह  गाडीत टाकून पळवून नेला, अशी तक्रार नर्स अर्चना रामेश्वर पिंगळे यांनी दिली. या तक्रारीवरुन बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

इथून पुढे कुठल्याही नातेवाईकांना मृतदेह परस्पर घेऊन जाता येऊ नये यासाठी सुरक्षा वाढवण्यासाठी जिल्हा पोलिस प्रशासनाला पत्र दिले असल्याचे  अतिरिक्त शल्यचिकित्सक सुखदेव राठोड यांनी सांगितले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.