Love Jihad In Indore : मध्य प्रदेशची आर्थिक राजधानी इंदूरमधून लव्ह जिहादचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथे एक तरुण ओळख लपवून हिंदू मुलींशी मैत्री करायचा आणि नंतर त्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून सुलभ शौचालयात नेऊन त्यांच्यासोबत अश्लील कृत्य करायचा.
यासाठी आरोपींनी सुलभ शौचालयात असलेल्या कर्मचाऱ्यांना 200 रुपये प्रवेश शुल्कही दिले. बुधवारीही आरोपींने असाच प्रकार केला, मात्र बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना माहिती मिळताच ते घटनास्थळी पोचले तेथे एकच गोंधळ उडाला यादरम्यान, संधी साधून आरोपी पळून गेला.
बजरंग दलाच्या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळ गाठून मुलीची चौकशी आणि समुपदेशन करण्याची प्रक्रिया सुरू केली. इंदूरच्या परदेसीपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील जनता क्वार्टरचे हे प्रकरण आहे. जनता क्वार्टरजवळ असलेल्या शासकीय सुलभ शौचालयात आरोपींनी हा गुन्हा करण्याचा प्रयत्न केला.
बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, या टॉयलेटमधील कर्मचाऱ्यांची आरोपी साहिलसोबत मैत्री होती. तर साहिल भागात तो हिंदू नाव आणि ओळख घेऊन फिरत असे आणि हिंदू मुलींशी मैत्री करत, त्यांना प्रेमात अडकवून त्यांचे लैंगिक शोषण करत असे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी साहिल अनेकदा काही मुलांना आमिष दाखवत असे तसेच टॉयलेटचे कर्मचारी त्याच्याकडून टॉयलेट वापरासाठी 200 रुपये घेत. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, बुधवारी रात्री उशिरा त्यांना माहिती मिळाली की, तो दुसऱ्या मुलीसोबत शौचालयात आला होता. या माहितीवरून बजरंग दलाचे कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले. येथील अपंग शौचालयाचे गेट उघडण्याचा प्रयत्न केला असता ते उघडले नाही.
मी आत जाऊन पाहिले असता आरोपी मुलीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत असल्याचे दिसले. बराच वेळ गेल्यानंतर आरोपीने गेट उघडले असता त्याची चौकशी करण्यात आली. त्यामध्ये आरोपीने आपले हिंदू नाव सांगितले, मात्र त्याच्याकडे त्याचे आधार कार्ड मागितले असता तो पळू लागला. मात्र पळतांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना बेदम मारहाण केली. यानंतर आरोपीने तारिक अशी आपली खरी ओळख उघड केली. मात्र यादरम्यान शौचालय कर्मचारी आणि आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले.