शिवप्रतिष्ठान तर्फे दुर्गामाता दौडीचे 9 दिवस आयोजन
जामखेड : “शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, वेडात मराठे वीर दौडले सात, जय जय महाराष्ट्र माझा, जय भवानी जय शिवाजी, भारत मातेचा जयजयकारचे चित्र जामखेड शहरात नऊ दिवस पहाटे निघणारी दौडेत अनुभवायला मिळते.
शिवप्रतिष्ठानचे संभाजीराव भिडे यांच्या प्रेरणेने जामखेड शहरात श्री दुर्गामाता दौड निघते. पहाटे निघणाऱ्या दौडीतून शांतता व शिस्तबद्ध फेरी मूळे शिवशाही अवतरल्याचे चित्र जामखेड करांना पहायला मिळत आहे.
या दौडीला तरुणांसह लहान थोरांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जामखेड तालुका प्रमुख पांडुराजे भोसले यांनी बोलताना हे कार्य देव देश धर्म व तरुणांना व्यसनापासून दूर करण्यासाठी, तसेच तरुणांना शिवरायांच्या इतिहास बद्दल आवड निर्माण व्हावी व देव देश धर्मावर येणाऱ्या संकटापासून रक्षण व्हावे. अशी जगदंबेच्या चरणी मागण्यासाठी ही दौड निघते.
या दौडीचा समारोप मंगळवारी दुपारी ०४ वाजता दुर्गामाता मंदिर बाजारतळ येथून निघून लोहारदेवीची महाआरती करून शस्त्र पूजन व देवीच्या माळावर रावण दहनाचा कार्यक्रम करून होणार आहे.