मुंबई – शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी फादर स्टॅन स्वामी यांच्या मृत्यूबद्दल मोदी सरकारवर टीका केली होती. त्यांच्या या टीकेला भाजप प्रदेशच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
https://www.facebook.com/edainikprabhat/videos/539727857467869
चित्रा वाघ म्हणाल्या की, ”सामना चे कार्यकारी संपादक तसेच सोनिया सेनेचे प्रवक्ते संजय राऊत हे फादर स्टॅन सामी जे कोर्टाच्या निर्देशानुसार नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपामुळे कारागृहात होते त्यांचा मृत्यू झाल्याने प्रचंड अस्वस्थ झालेले दिसतात.”
“सामना चे कार्यकारी संपादक आणि सोनिया सेनेचे प्रवक्ते संजय राऊतजी हे फादर स्टॅन स्वामी, जे कोर्टाच्या निर्देशानुसार नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपामुळे कारागृहात होते, त्यांचा मृत्यू झाल्याने प्रचंड अस्वस्थ झालेले दिसतात. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जनतेपर्यंत पोहोचावेत यासाठी सामना वृत्तपत्राची निर्मिती करण्यात आली होती. पण संजय राऊत स्वत:च्या मखलाशीसाठी त्या विचारांना बगल देत सामना चा गैरवापर करत आहेत. आता तर तुम्ही हद्दच ओलांडलीत.”
”भीमा-कोरेगाव दंगलीतील मुख्य सूत्रधार आरोपी असलेल्यांना तुम्ही लेखणीतून बळ द्यायचं काम करत आहात. तसेच, त्यांची तुलना तुम्ही कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्याशी करत आहात. मोदींचे सरकार स्टॅन स्वामी यांनी घाबरत होते, असं तुम्ही म्हणाला आहात. पण एका गोष्टीचा विचार करा की या नक्षलवाद्यांना रसद पुरवणाऱ्या चीनी ड्रॅगनला मोदीजी घाबरत नाहीत, तर मग या अशा लोकांना ते स्वप्नात तरी घाबरतील का?”, अशा शब्दात भाजपच्या चित्रा वाघ यांनी संजय राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.”
काय म्हणाले होते संजय राऊत?
स्वामी हे राष्ट्रीय तपास एजन्सीच्या ‘कस्टडी’त बऱयाच काळापासून होते. त्यांचे वय 84 वर्षे. त्यांना ऐकता, बोलता येत नव्हते. दिसतही नव्हते. त्यांच्या हालचाली व श्वास पूर्ण मंदावला असताना तुरुंगातच त्यांना कोरोनाने ग्रासले. जीवनाच्या अंतिम समयी त्यांना झारखंड येथे जाऊन मित्रांसमवेत वेळ घालवायचा होता. पण स्वामी यांच्यावर दहशतवाद, फुटीरतावाद, राज्य उलथवून लावण्याच्या कटात सहभागी होण्याचा आरोप होता. 84 वर्षांचा एक गलितगात्र राजशकट उलथवून टाकू शकतो इतका हा देश भुसभुशीत पायावर उभा आहे काय?
इंदिरा गांधींनी त्या काळात जॉर्ज फर्नांडिस यांची प्रचंड भीती घेतली होती. जॉर्ज तेव्हा तरुण नेते होते. फादर स्टॅन स्वामींप्रमाणे ते जर्जर, मूकबधिर, अंध झाले नव्हते. इंदिरा सरकार ‘अँग्री यंग मॅन’ जॉर्जला घाबरले. पण आजचे सरकार 84-85 वर्षांच्या फादर स्टॅन स्वामी, वरवरा राव यांना घाबरले आहे.