शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याकडे 19 कोटींची संपत्ती

पुणे – शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याकडे 19 कोटी 79 लाख रुपयांची तर पत्नीकडे 8 कोटी 72 लाख रुपयांची मालमत्ता आहे. त्याचबरोबर या दोघांच्या नावे संयुक्त नावेही 4 कोटी 97 लाख रुपयांची गुंतवणूक आहे. त्याचबरोबर आढळराव पाटील यांच्या नावावर 2 कोटी 5 लाख रुपयांचे तर पत्नीच्या नावे 2 कोटी 93 लाख रुपयांचे कर्ज असल्याची माहिती उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या शपथपत्रात दिली आहे.

आढळराव पाटील यांच्याकडे 17 हजार 308 रुपये तर पत्नीकडे 1 लाख 75 हजार रुपये रोख रक्‍कम आहे. तर संयुक्त खात्यामध्ये 82 हजार रुपयांची रोख रक्‍कम आहे. आढळराव पाटील यांच्याकडे 34 लाख 12 हजार रुपयांची गुंतवणूक मुदतठेवीच्या स्वरुपात आहे. तरपत्नीच्या नावावर 46 हजार रुपयांची गुंतवणूक मुदतठेवीमध्ये आहे. तर संयुक्त खात्यामध्ये 1 लाख 32 हजार रुपयांच्या मुदतठेवी आहेत. बॉण्ड, शेअर्स यामध्ये आढळराव पाटील यांनी 8 लाख 44 रुपयांची तर त्यांच्या पत्नीने 12 लाख 84 हजार रुपयांची गुंतवणूक केली आहे. पोस्ट खाते, एलआयसी आदींमध्ये 1 कोटी 20 लाख रुपयांची गुंतवणूक आढळराव पाटील यांनी तर पत्नीने 17 लाख 65 हजार रुपयांची गुंतवणूक केली आहे. आढळराव पाटील यांच्याकडे 20 हजार रुपये किमतीचे वाहन आहे. तर पत्नीच्या नावे वाहन नाही. आढळराव पाटील यांच्या पत्नीकडे 49 लाख किमतीचे सोने-चांदी असे जडजवाहीर आहे.

आढळराव पाटील यांच्याकडे चिंचोडी, लांडेवाडी, मंचर, राजगुरुनगर, पुणे आणि मुंबई येथे स्थावर मालमत्ता असून त्यांची किंमत 16 कोटी 80 लाख रुपये इतकी आहे. तर पत्नीच्या नावावर असलेल्या स्थावर मालमत्तेची किमत 6 कोटी 93 लाख रुपये इतकी आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.